शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकामांकडे गावकºयांनी लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:12 IST

प्रत्येक गावात शासकीय खर्चाने आमदार वा इतर फंडातून गावविकासाची बांधकामे होत असतात. ही सर्व सार्वजनिक बांधकामे दर्जेदार होण्यासाठी बांधकाम सुरू असताना ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे.

ठळक मुद्देअमर काळे : ग्रामपंचायत भवन गावाला समर्पित, ज्येष्ठ कर्मचाºयाचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : प्रत्येक गावात शासकीय खर्चाने आमदार वा इतर फंडातून गावविकासाची बांधकामे होत असतात. ही सर्व सार्वजनिक बांधकामे दर्जेदार होण्यासाठी बांधकाम सुरू असताना ग्रामस्थांनी विशेष लक्ष द्यावे. बांधकाम जरी शासन करीत असले तरी लागणारा पैसा कर रूपाने भरलेला आपला असतो. बांधकाम दर्जेदार करून घेणे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी केवळ कंत्राटदारावर अवलंबून राहता येणार नाही, असे मत आ. अमर काळे यांनी व्यक्त केले.चंदेवाणी येथील ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण तथा सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी सतत लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला पाहिजे. प्रसंगी आग्रह धरला पाहिजे. जो अधिक पाठपुरावा करेल, त्यांच्या समस्या आधी सुटतात, हा निसर्ग नियम आहे, असे ही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कांबळे तर अतिथी म्हणून मंगेश पाचपोर, उपसरपंच अजय इंगळे, उत्तम इंगळे, रामराव मुडे, घोरमाडे, महिला सदस्य शीला भुयार, कल्पना पांढरीपांडे, घोरमाडे आदी उपस्थित होते. यावेळी मंगेश पाचपोर, प्रा. अरुण फाळके यांनीही विचार व्यक्त केले. ज्ञानेश्वर इंगळे व इतर ग्रामस्थांनी गावातील पांदण रस्ता, नदीवरील रपटा, समाज मंदिर आणि स्मशान शेड आदी समस्या लवकर सोडविण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावे, असा आग्रह धरला.कार्यक्रमाचे संचालन निमकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामसेवक आडे यांनी मानले. याप्रसंगी ग्रा.पं. चे ज्येष्ठ कर्मचारी (शिपाई) बबनराव इंगळे यांचा आ. अमर काळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, ग्रा.पं. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उपक्रमांचे कौतुकचंदेवाणी गावात ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गाव, एक देवी’ हा उप्रकम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गावात एकोपा निर्माण होण्यास मदत होत आहे. या उपक्रमाचे आ. अमर काळे कौतुक केले. या गावाला ५ लाख रुपयांचा विशेष निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी कार्यक्रमात केली. शिवाय ग्रामस्थांच्या अन्य उपक्रमांचेही आमदारांनी कौतुक केले.