शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘सशक्त कन्या, सशक्त भारत’वर पथनाट्य

By admin | Updated: August 27, 2014 23:46 IST

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेल मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या येथील नेहरू युवा केंद्राद्वारे जागृती व शिक्षा कार्यक्रम आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथे पार पडला.

वर्धा : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेल मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या येथील नेहरू युवा केंद्राद्वारे जागृती व शिक्षा कार्यक्रम आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथे पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच जीवन राऊत तर अतिथी म्हणून महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, माजी सरपंच सुमन पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष शाम पवार, पोलीस पाटील गणपत इंगोले, शाळा समिती अध्यक्ष गोपाल निकम, नेहरू युवा केंद्र, वर्धा चे लेखापाल धरमलाल घुवारे, नाना देशमुख, नीलेश सयाम हे प्रामुख्याने उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन करताना रजनी देशमुख म्हणाल्या, ग्रामीण युवक युवतींनी आपल्या सर्वांगीण उन्नतीकरण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरणे आवश्यक आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाची माहिती घेऊन त्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे व स्वत:चा रोजगार सुरू करावा. यासाठी तालुका व जिल्हास्तरावर वेळोवेळी आयोजित करण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असेही त्या यावेळी म्हणाल्या. अध्यक्षीय भाषणात जीवन राऊत म्हणाले, युवकांनी विधायक कामात सहभागी होऊन गावाच्या विकासात हातभार लावावा व गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सहकार्य करावे. एकमेकांच्या सहकार्याने सर्व कामे होत असतात. त्यासाठी जिद्द व चिकाटीची गरज आहे आणि ही जिद्द अशा कार्यक्रमांतून निर्माण होत असल्याचे मे म्हणाले.सतीश इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली.नेहरू युवा केंद्र, वर्धा, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वर्धा, तंत्रनिकेतन प्रशिक्षण संस्था, पिंपरी (मेघे) तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणात प्रशिक्षण घेवून आपला स्वरोजगार सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमात केले. कार्यकमाचे संचालन प्रिया पवार यांनी केले. आभार विलास राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सशक्त कन्या, सशक्त भारत या विषयावर महेश डूबे, दीपक तपासे, विकास कांबळे, शैला बालपांडे, आरती केळवटकर, नितीन वाघमारे यांनी उपस्थितांना विविध स्वयंरोजगार विषयक उपक्रमांची माहिती देऊन महिलांविषयी आदराची भावना, समानतेची वागणूक शिक्षा व जागृती याविषयी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिली. यशस्वितेसाठी नेहरू युवा केंद्र, वर्धाचे मंगेश डूबे, पिंपळगाव (भोसले) येथील राहूल पवार, अजय राऊत, प्रवीण चौधरी, सुरज राऊत, प्रफुल चौधरी यांनी सहकार्य केले. अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)