शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर’ गाड्या ‘आॅर्डिनरी’ केल्याने प्रवासी त्रस्त

By admin | Updated: November 11, 2014 22:46 IST

भंगारगाड्या व विस्कळीत वेळेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आगाराने सामान्य प्रवाशांच्या त्रासात भर टाकत आर्वी नागपूर तसेच आर्वी अमरावती या मार्गावरील अनेक गाड्या

आर्वी : भंगारगाड्या व विस्कळीत वेळेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आगाराने सामान्य प्रवाशांच्या त्रासात भर टाकत आर्वी नागपूर तसेच आर्वी अमरावती या मार्गावरील अनेक गाड्या सुपरवरून आॅर्डिनरी केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.आर्र्वी आगारातून आर्वी-नागपूर साठी दररोज काही गाड्या सोडल्या जातात. हे अंतर जवळपास १२० किमीचे आहे. तसेच आर्वी-अमरावती हे अंतरही ६० ते ७० किमीच्या आसपास आहे. आर्वी आगाराच्या या मार्गावरील अनेक बसफेऱ्या या सुपर वरून आर्डनरी केल्याने प्रवाशांचा चांगलाच संताप होत आहे.आर्र्वी नागपूर हे १२० कि़मीचे अंतर सुपर गाडीने जाण्यालाही अडीच ते तीन तासांचा अवधी लागतो. त्यात आर्वी वरून थेट नागपूरला कामानिमित्त व्यापारी नोकरदार, शासकीय कार्यालयीन कामाकाजासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या गाड्या आॅर्डिनरी केल्याने प्रवाशांना आर्वी तळेगाव पर्यंत जाऊन तळेगावला उतरून दुसऱ्या डेपोची गाडी पकडावी लागते. यात लांबपल्याच्या गाड्या असल्याने प्रवाशांना गाडीत बसण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचा सध्या चांगलाच संताप होत आहे. त्याचप्रकारे आर्वीवरून अमरावती येथे जास्त असलेल्या प्रवाशांची संख्या ही मोठी आहे. या मार्गावरीलही अनेक बसफेऱ्या या आॅर्डिनरी केल्याने या मार्गावरील नागरिकही संताप व्यक्त करीत सुपर बसेस पूर्ववत कराव्या किंवा बसेस वाढवाव्या, अशी मागणी होत आहे.आर्वी तालुका व उपविभागीय कार्यालयाचे ठिकाण असलेल्या आर्वी परिवहन विभागाकडे ६१ बसगाड्या असून दिवसभरात ५८ बसफेऱ्याचे वेळापत्रक आहे तर २७ हजार प्रवासी रोज या बसफेऱ्यातून प्रवास करून आर्र्वी आगाराला साडेचार ते पाच लाखांचा दररोजची आवक आहे. आर्वीवरून नागपूरला जाण्यासाठी रोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आर्र्वीतून सर्वाधिक असल्याने आर्वी नागपूर हा सुपर प्रवास आर्वी तळेगाव पर्यंत करून प्रवाशांना तळेगाव वरून दुसरी गाडी पकडावी लागते. आर्र्वी आगाराने लांब पल्यांच्या गाड्या आॅर्डिनरी केल्याने सध्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्वी नागपूर या सुपर गाड्या प्रमाणेच आर्र्वी अमरावती, आर्वी वर्धा या मार्गावरील सुपर गाड्या आॅर्डिनरी केल्याने सामान्य प्रवाशांची सध्या चांगलीच पंचाईत व मनस्ताप सहन करावा लागत आहे. या आॅर्डिनरी गाड्यामुळे परिवहन विभागाचे वेळापत्रक कोलमडत आहे. या गाडीतून प्रवास करणाऱ्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही नियोजित वेळेत शाळा व महाविद्यालयात पोहचण्यास उशिर होत आहे. या सर्व सुपर गाड्या पूर्ववत करण्याची प्रवाशांची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)