शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रवासी, विद्यार्थ्यांना बसखाली उतरवित फेरी केली रद्द

By admin | Updated: November 9, 2016 01:03 IST

वर्धा ते माळेगाव (ठेका) ही बस फलाटावर लावण्यात आली. प्रवासी व विद्यार्थी बसमध्ये बसले;

वाहकाचा प्रताप : एसटी रद्द झाल्याने सायंकाळपर्यंत ताटकळआकोली : वर्धा ते माळेगाव (ठेका) ही बस फलाटावर लावण्यात आली. प्रवासी व विद्यार्थी बसमध्ये बसले; पण कमी प्रवासी असल्याचे कारण समोर करून दीड वाजताची ही बसफेरी रद्द करण्यात आली. वाहक व परिवहन महामंडळाने केलेल्या या प्रतापामुळे प्रवाशांना तब्बल ४.३० वाजेपर्यंत वर्धा बसस्थानक व सुकळी (बाई) फाट्यावर ताटकळावे लागले.वर्धा ते माळेगाव (ठेका) या आडवळणाच्या मार्गावर खासगी वाहतुकीची पुरेशी सोय नाही. आॅटो, मिनीडोअर केवळ आकोलीपर्यंत आहेत. पूढे बसशिवाय अन्य पर्याय नाही. यामुळे प्रवाशांना बसवर अवलंबून राहावे लागते. नेहमीप्रमाणे या मार्गावर प्रवास करणारे व विद्यार्थी बसच्या वेळेवर बसस्थानकात पोहोचले. दीड वाजताची बसफेरी फलाटावर लावण्यात आली. यामुळे प्रवाशांना हायसे वाटले. १५ महिला व पुरुष प्रवासी बसमध्ये स्थानापन्न झाले. यानंतर वाहकाचे आगमन झाले. प्रवासी तिकीट काढायला गेले असता त्यांना बसखाली उतरण्याचे फर्माण वाहकाने सोडले. बसखाली उतरविण्याचे कारण विचारले असता १५ प्रवाशांसाठी बस सोडायला परवडत नाही. बसफेरी रद्द करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे हिरमोड झालेल्या प्रवाशांनी आगार प्रमुखाची भेट घेत घडलेली हकीकत सांगितली; पण आगार प्रमुखांनीही वाहकाची री ओढली. यामुळे प्रवासी दुसऱ्या बसने सुकळी (बाई) फाट्यापर्यंत आले; पण माळेगाव (ठेका) कडे जाणारे आॅटो वा मिनीडोअर कमी असल्याने प्रवाशांना ४.३० पर्यंत फाट्यावर जांभळ्या ताटकळावे लागले.(वार्ताहर)