शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाचे पैसे हिसकाविणारा आॅटोचालक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:32 IST

देवळी तालुक्यातील मुरदगाव येथील सचिन लक्ष्मण राऊत हा इतवारा येथील पारधी बेड्यावर आला असता एका आॅटोचालकाने बस स्थानकाकडे जायचे आहे काय असे म्हणत सचिनला आॅटोत बसवून घेतले. याच दरम्यान सदर आॅटो चालकाने सचिनजवळील पाकिट आणि मोबाईल हिसकावून पळ काढला.

ठळक मुद्देशहर पोलिसांची कारवाई : आॅटोसह चोरीचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील मुरदगाव येथील सचिन लक्ष्मण राऊत हा इतवारा येथील पारधी बेड्यावर आला असता एका आॅटोचालकाने बस स्थानकाकडे जायचे आहे काय असे म्हणत सचिनला आॅटोत बसवून घेतले. याच दरम्यान सदर आॅटो चालकाने सचिनजवळील पाकिट आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत अवघ्या काही तासात चोरट्यास हुडकून काढत बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आबीद खाँ अकबर खाँ पठाण (२०) रा. पुलफैल, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, सचिन राऊत हा १९ रोजी दुपारी ईतवारा मार्गाने पारधी बेड्याजवळ आला होता. याच वेळी एक अनोळखी आॅटो चालकाने त्याला बस स्टॅन्ड येथे जायचे आहे काय असे विचारून त्याला आॅटोत बसवून घेतले. त्यानंतर आरोपी आॅटोचालकाने परिसरात कुणी नसल्याची संधी साधून सचिन जवळील पाकिट व पाकिटातील रोख ४३० रुपये तसेच एक मोबाईल आणि घड्याळ असा एकूण १ हजार ९३० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला गती दिली. शिवाय आॅटोचालक आबीद खाँ अकबर खाँ पठाण याला सेवाग्राम रेल्वे स्थानक येथून अवघ्या काही तासातच ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला आॅटो जप्त करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक, पपीन रामटेके, सतीश वैरागडे, सचिन दवाळे, मंगेश झामरे, आकाश कांबळे, रामेश्वर नागरे, किशोर साटोण, निखी वासेकर यांनी केली. या चोरट्यापासून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी