शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जमाखर्चाचा पवनार पॅटर्न जिल्ह्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:33 IST

जिल्ह्याच्या दौऱ्यावर २०१८ मध्ये आलेल्या पंचायत राज समितीला पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी मागील ३ वर्षांच्या जमाखर्चाची विवरण पुस्तिका सादर केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी या कामाचे कौतुक केले.

ठळक मुद्देपंचायत राज समितीच्या निर्देशानंतर जि.प.चा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या दौऱ्यावर २०१८ मध्ये आलेल्या पंचायत राज समितीला पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी मागील ३ वर्षांच्या जमाखर्चाची विवरण पुस्तिका सादर केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी या कामाचे कौतुक केले. एखादी ग्रामपंचायत असे काम करू शकते, तर संपूर्ण जिल्ह्यात हे काम का होऊ शकत नाही, अशी विचारणा करून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सदर उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याबाबत निर्देश दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व ग्रामपंचायतींना याबाबत पत्र दिले व असा उपकम राबविण्याबाबत सूचना केली आहे.पवनार ग्रामपंचायतीने सन २०१४-१५ पासून दरवर्षी ग्रामपंचायतमार्फत गावात केल्या जाणाऱ्या विकास कामांवर झालेला खर्च तसेच ग्रामपंचायतीचा दैनंदिन खर्च नागरिकांना कळावा, याकरिता पुस्तिका छापून त्याचे वितरण गावात करण्याची परंपरा सुरू केली. सरपंच अजय गांडोळे यांनी या कामात पुढाकार घेतला. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही विदर्भातील पहिली ग्रामपंचायत आहे. राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही पवनार ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाची प्रशंसा केली होती. पवनार ग्रामपंचायतीत सध्या सरपंचाशिवाय एकही सदस्य पदावर नाही. प्रशासक व ग्रामविकास अधिकारी सरपंचाच्या नेतृत्वात काम पाहत आहे. यावर्षी चौथ्यांदा ग्रामपंचायतीने खर्चाची पुस्तिका प्रकाशित केली. जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंचायतराज समिती आली असतांना पवनार ग्रामपंचायतीचा हा उपक्रम पाहून सदर उपक्रम जिल्हाभर राबविण्याबाबत सूचना केली. त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती, वर्धा यांनी ३ मे रोजी पत्र काढून वर्धा पंचायत समितीतंर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींनी वार्षिक खर्चाचा अहवाल करदात्या ग्रामस्थांना अहवाल स्वरूपात द्यावा, असे निर्देश सरपंच, सचिव यांना दिले. इतर तालुक्यातही असे पत्र ग्रामपंचायतींना देण्यात आल्याची माहिती सरपंच गांडोळे यांनी दिली. पवनारचा हा खर्च पॅटर्न जिल्हाभर राबविला जाण्याची शक्यता आहे. पवनार गावात सेवाग्राम विकास आराखड्यातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली आहे. त्यामुळे नदीघाट, नंदीखेडा, व गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. यामागे सरपंचाचा पाठपुरावा कारणीभूत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPavnarपवनार