शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नानावटीत पंकज भोयर यांचा अहवाल निगेटिव्ह; प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:36 IST

मुंबईमध्ये आमदार डॉक्टर पंकज भोयर यांची चाचणी केल्यावर तेथे अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता केवळ इंन्फेक्शन संदर्भात डॉ. अब्दूल अन्सारी हे उपचार करीत असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देइंन्फेक्शनकरिता उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना कोरोनाची लागण झाली असतानाच घशात आणि फुफ्फुसामध्ये इंन्फेक्शन झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ सावंगी रुग्णालयातून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मुंबईच्या नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून यादरम्यान केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने दोन दिवसात त्यांना सुटी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.आमदार डॉ. भोयर यांचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरु असतानाच त्यांच्या घशात आणि फुफ्फुसामध्ये इंन्फेक्शन झाल्याने उपचार करुनही आराम पडत नव्हता. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचाराकरिता नानावटी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना मुंबईला हलविले त्याच दिवशी सावंगी रुग्णालयातील दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. पण, मुंबईमध्येही त्यांची चाचणी केल्यावर तेथेही अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता केवळ इंन्फेक्शन संदर्भात डॉ. अब्दूल अन्सारी हे उपचार करीत असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आमदारांचे भावनिक आवाहनवर्ध्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे काळजी वाटत आहे. कारण कोरोनाची तीव्रता मी स्वत: अनुभवत आहे. मी बाधित झाल्याचे कळल्यानंतर माझ्यापेक्षा माझ्या संपर्कातील व्यक्तींचे कसे, याची चिंता वाटायला लागली. वेळेत मी स्वत: क्वारंटाईन करुन घेतल्याने संसर्ग टळला. पण, विनाकारण घराबाहेर पडू नका, नियमांचे पालन करुन गर्दी करणे टाळा. प्रशासनावर आधीच ताण आहे तो आणखी न वाढविता त्यांना सहकार्य करा. कोरोनाबाधित होणे कुठलाही गुन्हा नसून रुग्णांना चांगली वागणूक देवून त्यांचे मनोबल वाढवा, आपले सहकार्यच बाधितांसाठी प्रभावी औषध म्हणून कार्य करते, असे भावनिक आवाहन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर