शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

पंचायत समितीला इमारत नवीन, पण रस्ता जुनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:29 IST

स्थानिक पंचायत समितीची जुनी वास्तू पाडून नवीन टोलेजंग व अद्यावत वास्तू बांधण्यात आली. वास्तूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; ....

ठळक मुद्देखासदारांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : स्थानिक पंचायत समितीची जुनी वास्तू पाडून नवीन टोलेजंग व अद्यावत वास्तू बांधण्यात आली. वास्तूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; पण या इमारतीकडे जाणाºया रस्त्याचे अद्यापही बांधका करण्यात आले नाही. यामुळे खा. रामदास तडस यांनी या रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.सुमारे ४ कोटी रुपयांचा खर्च करून कारंजा पंचायत समितीची इमारत बांधण्यात आली आहे. भले मोठे सभागृह, सभापती, उपसभापती कक्ष तसेच कृषी आस्थापना, विस्तार अधिकारी कक्ष, प्रसाधन गृह, अभियंता कक्ष, अंतर्गत विद्युत फीटींग, टाईल्स, सॅनेटरी, प्लंबींग सर्व प्रकारची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री वा मोठ्या मंत्री महोदयांच्या इमारतीचे लोकार्पण अपेक्षित आहे. इमारत आकर्षक झाली आहे; पण या इमारतीमध्ये ये-जा करण्यासाठी असलेला रस्ता तयार करण्यात आला नाही. सद्यस्थितीत जुना रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहने तर सोडा, साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. वास्तूसोबत रस्ताही होणार, अशी अपेक्षा पदाधिकारी व नागरिकांना होती; पण वास्तूचा खर्च अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. सदर रस्ता जवळपास ६० फुट रूंद आणि १५० फुट लांब रस्ता आहे. सिमेंटचा रस्ता बांधायचा झाल्यास २५ लाख रुपयांचे बजेट आहे. खा. तडस यांना निवडून देण्यात कारंजा तालुका वासियांचा मोठा सहभाग आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. खासदारांना दरवर्षी मोठा निधी मिळतो. त्यातून या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.नागरिक तालुक्यातील भाजप नेत्यांकडे या कामासाठी आग्रह धरीत आहे. पं.स. सभापती मंगेश खवशी, भाजपा तालुकाध्यक्ष मुकूंद बारंगे, ज्येष्ठ कार्यकर्ते हरीभाऊ धोटे, माजी आमदार केचे या रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी खा. तडस यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. हा रस्ता झाल्यास पंचायत समितीमध्ये ये-जा करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. पं.स. मध्ये वाहने जाऊ शकणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.