शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पी. चिदंबरम यांनी जाणल्या दत्तकग्राम मदनीवासीयांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:32 IST

दत्तकग्राम योजनेंतर्गत माजी केंद्रीय मंत्री खा. पी. चिदंबरम यांनी वर्धा जिल्ह्यातील मदनी हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या विकासाची धूरा त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी शनिवारी या गावाला भेट देत समस्यांची माहिती घेतली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत दिल्या कामांच्या सूचना

ऑनलाईन लोकमत वर्धा : दत्तकग्राम योजनेंतर्गत माजी केंद्रीय मंत्री खा. पी. चिदंबरम यांनी वर्धा जिल्ह्यातील मदनी हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या विकासाची धूरा त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी शनिवारी या गावाला भेट देत समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गावकºयांशी संवाद साधत विविध प्रस्ताव स्वीकारले.मदनी ग्रामपंचायतच्या प्रांगणात गावातील नागरिकांच्या उपस्थितीत गावामध्ये राष्ट्रीयकृत बँक शाखा, क्रीडांगण, वाचनालय, सांस्कृतिक भवन, गावातील पाणी पुरवठा योजना, व्यायाम शाळा, या सगळ्या कामाकरिता लागणाºया जागेची स्वत: पाहणी केली. सोबत अनेक विकास कामांचे प्रस्ताव गावकºयांकडून घेण्यात आले. यावेळी आ. कांबळे यांच्याशी चर्चा करून विकास कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गावाच्या भेटीनंतर विकासाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागातील अधिकाºयांची बैठक घेऊन संबंधित विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्यास सांगितले.याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कोल्हे, जि.प. सदस्य उज्वला देशमुख, मदनी सरपंच दीपक कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पांडुरंग देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनोहर खडसे, माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्ञानेश्वर ढगे, जि.प.सदस्य संजय शिंदे, सुमित्रा मलघाम, सुकेशिनी धनवीज, मनीष गंगमवार, सुनील बासु, माजी पं.स. सभापती बाळा जगताप, विपीन राऊत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू शर्मा, उपाध्यक्ष इक्राम हुसेन, श्रीकांत बारहाते, प्रमोद पोद्दार, विशाल हजारे, पुरुषोत्तम टोनपे, संगिता मोहर्ले, पं.स. सदस्य संदीप शिंदे, उपसरपंच अशोक अतकरसह गावकरी उपस्थित होते.सेवाग्राम आश्रमाला भेटसेवाग्राम : माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी महात्मा गांधी आश्रमला भेट देत बापू कुटीमधील सर्वधर्म प्रार्थनेत सहभाग घेतला. आश्रमात पी. चिदंबरम यांचे अधीक्षक भावेश चव्हाण व व्यवस्थापक नामदेव ढोले यांनी सूतमाळ व सेवाग्राम आश्रम पुस्तक देऊन स्वागत केले. आश्रम व स्मारकांची माहिती घेत सर्वधर्म प्रार्थना झाली. याप्रसंगी आश्रमाच्या कुसूम पांडे, शोभा, प्रभा शहाणे, मिथून हरडे, शंकर वाणी, राज थूल, सुधीर मडावी, जयश्री पाटील इत्यादी उपस्थित होते. आश्रमासमोर ११ आॅक्टोबर पासून सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सत्याग्रह सुरू आहे. या कर्मचाºयांनी पी. चिदंबरम यांना निवेदन देत माहिती दिली. यावेळी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीचे सागर कुत्तरमारे, मधुकर टोणपे, हरिदास वानखेडे इत्यादी उपस्थित होते.आश्रमातील अभिप्रायसेवाग्राम भेटीच्या संधीला माझे भाग्य समजतो. जिथे महात्मा गांधीजींनी १० वर्षे राहून भारतासाठी कार्य केले. मी भावमुग्ध झालो. ज्या पद्धतीने गांधीजी आपल्या ८० वर्षांपूर्वी वास्तू उभारल्या त्या आजही जशाच्या तशाच आहे. गांधीजींप्रती पवित्र आदरयुक्त भावना मी व्यक्त करतो.