शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन अन् रेमडेसिविर मुबलक तर लस ‘वेटिंग’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन साठवणूक क्षमता वाढविण्यात आली आहे. तर रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच त्याचा पुरवठा नियमित होत रहावा, यासाठी विशिष्ट यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत या दोन्ही बाबींसह कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पाहिजे तितका पुरवठा होत नसल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेच्या मागणीची वेळीच घेतली जातेय दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने तसेच जिल्ह्यातील अनेक व्यक्ती गाफिल असल्यागत वागत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. अशातच ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या मागणीत वाढही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, रेमडेसिविर तसेच कोविड व्हॅक्सिनबाबतची माहिती जाणून घेतली असता कोविडची प्रतिबंधात्मक लस वेटिंगवर तर ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले.भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन साठवणूक क्षमता वाढविण्यात आली आहे. तर रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच त्याचा पुरवठा नियमित होत रहावा, यासाठी विशिष्ट यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत या दोन्ही बाबींसह कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पाहिजे तितका पुरवठा होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या तिन्हीविषयी वेळोवेळी आढावा बैठक घेत वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत लस, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाचे लिक्विड ऑक्सिजन आणि रेमडेसिविर औषधाचा होत असलेल्या पुरवठ्याकडे बारकाईने लक्ष असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगतले.

वेळीच उपलब्ध करून दिले जातेय लिव्हिड ऑक्सिजनसेवाग्राम येथील रुग्णालयात सुमारे २० मेट्रीक टन, सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात १० मेट्रीक टन तर आदित्य एअर प्रोडक्ट देवळी येथे १६ मेट्रीक टन लिव्हिड ऑक्सिजन साठवणूक करण्याची व्यवस्था आहे. गुरुवार, १५ एप्रिलला  आदित्य एअर प्रोडक्ट देवळी येथे ७ मेट्रीक टन लिव्हिड ऑक्सिजन होते. तसेच दोन्ही काेविड रुग्णालयातही मुबलक ऑक्सिजन साठा होता असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णालयांकडून मागणी नोंदविताच जिल्हा प्रशासनाकडून वेळीच कार्यवाही करीत ऑक्सिजन साठा उपलब्ध करून दिल्या जात आहे.

जिल्ह्यात १,२७२ रेमडेसिविर इंजेक्शनजिल्ह्यातील दोन अधिकृत विक्रेत्यांना रेमडेसिविरची साठवणूक करण्याची परवानगी आहे. त्यांच्याकडे सध्या ७४ रेमडेसिविर इजेक्शन असून मागणी होताच हे अधिकृत विक्रेते केवळ कोविड रुग्णालयांनाच त्याचा पुरवठा करू शकतात. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात ७२७, सेवाग्राम रुग्णालयात २०२ आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात २६९ रेमडेसिविर इजेक्शन असल्याचे सांगण्यात आले. वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत रेमडेसिविर इजेक्शनचा काळा बाजार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे. शिवाय अधिकृत विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे.

व्हॅक्सिन तुटवड्यामुळे २५ केंद्र पडली बंदमुबलक लससाठा असताना आरोग्य विभागाने हळूहळू जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत ती ८४ पर्यंत आणली. परंतु, जिल्ह्यात तयार झालेल्या लस तुटवड्यामुळे सद्यस्थितीत तब्बल २५ लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला काेविशिल्डचे १ लाख ५८ हजार २० तर कोव्हॅक्सिनचे २० हजार ७६० डोज प्राप्त झाले. गुरुवारपर्यंत १,४३,४४७ व्यक्तींना लसीचा पहिला तर १९ हजार ३९९ व्यक्तींना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाने काेविशिल्डची २ लाख तर कोव्हॅक्सिनच्या ४ हजार डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

जिल्ह्याची मागणी लक्षात घेता वेळोवेळी मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तर सध्या मुबलक प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन आहे. तर मागणी करण्यात आलेली लस वेळीच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.- प्रेरणा देशभ्रतार,                जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस