शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मालक व चालक परतले, ट्रक बेपत्ताच

By admin | Updated: February 24, 2016 02:10 IST

महात्मा साखर कारखाना येथून काटोलकडे जाणारा ट्रक रहस्यमयरित्या मालक, चालकासह बेपत्ता झाला होता.

आर्थिक व्यवहारातून घडलेला प्रकारआकोली : महात्मा साखर कारखाना येथून काटोलकडे जाणारा ट्रक रहस्यमयरित्या मालक, चालकासह बेपत्ता झाला होता. यातील चालक व मालक दोघेही परत आले असून ट्रक मात्र अद्यापही बेपत्ताच आहे. १५ फेबु्रवारी रोजी ट्रक एमएच २७ एक्स ४७६४ ने मालक रामधन राठोड व चालक संजय नरूटे रा. पळसोना जि. हिंगोली हे काटोलकडे जात होते. दरम्यान, वाटेतून त्यांचा ट्रक बेपत्ता झाला, अशी तक्रार ट्रक मालकाचा मुलगा भारत राठोड याने सेलू पोलिसांत केली होती. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत होते. दरम्यान, मंगळवारी मालक व चालक सेलू पोलीस ठाण्यात हजर झाले. चार चाकी वाहनातून आलेल्या नऊ लोकांनी ट्रक अडविला, धमकी देत दोघांनाही वाहनात कोंबून ट्रकसह अमरावती मार्गे औंढा-परभणी मार्गावर सोडल्याचे या दोघांनी सांगितले. ट्रक मालकाने महात्मा सहकारी साखर कारखान्याशी करार केला होता. शिवाय मराठवाड्यातील दुसऱ्या एका कारखान्याशीही करार करून सहा लाख रुपयांचा अग्रीम घेतला; पण मराठवाड्यातील त्या कारखान्याकडे ट्रक पाठविला नाही. तो ट्रक महात्मा साखर कारखान्यात पाठविला. यामुळे संबंधित कारखान्याचे कंत्राटदार आणि ट्रक मालकामध्ये देवाण-घेवाणीतून वाद होता. ट्रक मालकाच्या मुलाने मराठवाड्यातील त्या कंत्राटदाराला ११ फेबु्रवारी रोजी तीन लाख व १२ फेबु्रवारी रोजी तीन लाख तसेच व्याजापोटी एक लाख रुपये दिल्याचे बँक व्यवहारातून दिसून येते. सेलूच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ताकीत यांनी दोघांचेही बयाण नोंदवून प्रकरण खरांगणा पोलिसांच्या स्वाधीन केले. (वार्ताहर) अखेर रहस्य उलगडलेजामणी येथून काटोलकडे जाण्यासाठी निघालेला ट्रक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. आठ दिवसांपासून ट्रक तसेच मालक व चालकाचा शोध घेतला जात होता. मंगळवारी ट्रकचा मालक व चालक सेलू पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी आपबिती सांगितली.