शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांच्यावर परप्रांतीय मजूर अद्यापही वर्ध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:49 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रांतीय मजूर ४२ निवारागृहांमध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका ४२ निवारागृहांत करताय घरवापसीची प्रतीक्षा

महेश सायखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रांतीय मजूर ४२ निवारागृहांमध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत. या मजुरांना आपल्या घराची ओढ लागली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने योग्य पाऊल उचलून त्यांची घरवापसी करावी अशी मागणी या मजुरांची आहे.देशात कोरोनाचा शिरकाव होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन लॉकडाऊन जाहीर केले. शिवाय परप्रांतीय मजुरांना जेथे आहात तेथेच थांबण्याचे आवाहन केले. सध्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारकडून मजुरांच्या घरवापसीसाठी विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. परंतु, वर्धा सारख्या छोट्या जिल्ह्यात अजूनही ३ हजार ११२ परप्रांतीय व इतर जिल्ह्यातील मजूर अडकून असल्याचे वास्तव आहे. या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली असली तरी त्यांना आपल्या घराची ओढ लागली आहे. सदर मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून वरिष्ठांच्या सूचनांची सध्या प्रतीक्षा आहे.५ हजार ७१ मजुरांना पाठविले स्वगावीलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिलला वर्धा जिल्ह्यात एकूण ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर असल्याची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ६१ निवारागृहात करण्यात आली होती. सदर निवारागृहांपैकी १३ शासकीय तर ४१ निवारागृह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार करून त्यात मजुरांना ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या एकूण ८ हजार १८३ मजुरांपैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल या दिवशी वर्धा जिल्ह्यात ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर होते. त्यापैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले आहे. तर सध्या स्थितीत केवळ ३ हजार ११२ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर वर्धा जिल्ह्यात आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या मजुरांना लवकरच त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येईल.- प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी वर्धा.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस