शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चितळासह बछड्यास काढले सुखरूप विहिरीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:16 IST

तळेगाव वनपरिक्षेत्रातील सिडेट कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या एका शेतातील निर्माणाधीन विहिरीत पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत असलेले चितळ व तिचा बछडा पडला. या दोघांची विहिरीत मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांसह प्राणीमित्रांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव वनपरिक्षेत्रातील सिडेट कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या एका शेतातील निर्माणाधीन विहिरीत पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत असलेले चितळ व तिचा बछडा पडला. या दोघांची विहिरीत मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून त्या दोघांनाही सुखरूप विहिरीबाहेर काढून जीवदान दिले.सध्या तळेगाव वनपरिक्षेत्रातील अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. अशातच पाण्याच्या शोधात असलेले चितळ व बछडा निर्माणाधीन विहिरीत पडले. विहिरीत वन्यप्राणी असल्याचे निदर्शनास येताच तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकाºयांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या चमुसह घटना स्थळ गाठले. शिवाय पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या मयुर वानखेडे यांनीही आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी तसेच वन्यप्राणी मित्रांनी शर्तीचे प्रयत्न करून विहिरीत पडलेल्या या वन्यप्राण्यांना सुखरूप विहिरीबाहेर काढले. या कार्यात फय्याज अली, पप्पु भुयार यांचे सहकार्य लाभले. या दोन्ही वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. या दोन्ही वन्यप्राण्यांची सुरूवातीला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.

टॅग्स :forest departmentवनविभाग