लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महावितरणच्या प्रत्येक डिसीवर कामाचा व्याप लक्षात घेता कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच ‘आऊट सोर्सींग’ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कामगार महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नेहमीच मोठे सहकार्य करीत असले तरी त्यांना गत तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नसल्याने सदर सुमारे २०० कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांची वेतनाविना सध्या आर्थिक कोंडीच होत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.महावितरणने विद्युत जोडणीचे मोठे जाळेच जिल्ह्यात टाकले आहे. कुठलाही छोटा-मोठा तांत्रिक बिघाड आल्यावर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महावितरणच्या कमचारी तो तात्काळ कसा दूर करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आऊट सोर्सींग कर्मचारी खांद्याला खांदा लावून सहकार्य करतात. परंतु, गत तीन महिन्यांपासून या कामगारांचे वेतन थकीत आहे. वेळीच वेतन न मिळाल्याने सदर कर्मचाऱ्यांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय उपास मारीची वेळही त्यांच्यावर आली आहे. महावितरण मधील आऊट सोर्सींग कर्मचाºयांची वेतनाची समस्या लक्षात घेता त्यांना तात्काळ वेतन देण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.अन् अधिकार गेले उपराजधानीतून राजधानीकडेमहावितरण कंपनीत कार्यरत असलेल्या आऊट सोर्सींग कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वी नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून दिले जात होते. परंतु, या कामगारांचे वेतन करण्याचे अधिकार मुंबई येथील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याने गत तीन महिन्यांपासून आऊट सोर्सींग कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
महावितरणच्या ‘आऊट सोर्सिंग’ कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:38 IST
महावितरणच्या प्रत्येक डिसीवर कामाचा व्याप लक्षात घेता कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच ‘आऊट सोर्सींग’ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कामगार महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नेहमीच मोठे सहकार्य करीत असले तरी....
महावितरणच्या ‘आऊट सोर्सिंग’ कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून आर्थिक कोंडी : २०० कामगारांवर उपासमारीची वेळ