शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सभापतींच्या निवडीवर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 22:39 IST

जिल्हाधिकारी वर्धा यांच्या २२ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार विशेष सभेचे आयोजन येथील नगर पंचायत मध्ये करण्यात आले होते. नगर पंचायतमधील स्थायी समिती, बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य व नियोजन आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती या समित्यांचे सभापतींची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देसमुद्रपूर नगरपंचायतीतील प्रकार । मनमर्जीने मिळविला विजय

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच समुद्रपूर येथील नगर पंचायत मध्ये सत्तारूढ असलेल्या पदाधिकाऱ्यांमधील सत्ता संघर्ष टिपेला पोहचला. शनिवारी विविध विषय समितीच्या सभापती पदांची निवडणूक होत असताना सत्ताधारी पक्षातील तीन नगरसेवक व विरोधी पक्षातील चार नगरसेवक अशा एकूण सात नगरसेवकांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. या व्यतिरिक्त दोन स्वीकृत सदस्यांनी बैठकीला गैरहजेरी नोंदविली.जिल्हाधिकारी वर्धा यांच्या २२ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार विशेष सभेचे आयोजन येथील नगर पंचायत मध्ये करण्यात आले होते. नगर पंचायतमधील स्थायी समिती, बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य व नियोजन आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती या समित्यांचे सभापतींची निवड करण्यात आली. सभागृहात एकूण १७ नगरसेवकांपैकी केवळ दहा नगरसेवक उपस्थित होते. या निवडणुकीत सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता सत्ता पक्षातील काहींनी मनमर्जीने आपापल्या गळ्यात विजयी माळा टाकल्या. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रिया केवळ देखावा असल्याचा आरोप करीत विरोधी सदस्यांसह काही सत्तापक्षातील सदस्यांनी सदर निवडीवर बहिष्कार टाकला.विषय समिती निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बहिष्कार टाकणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी गटनेता मधुकर कामडी, आशिष अंड्रस्कर, सरिता लोहकरे, हर्षा डगवार, भाजपा समर्थित शेतकरी संघटनेचे अंकुश आत्राम, सुनिता सुरपाम, रवींद्र झाडे यांचा समोवश होता.सदर निवडणुकीत आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. कार्यहीन आणि अर्थहीन समितीत राहणे, अयोग्य वाटते. सबब शेतकरी संघटनेच्या दोन नगरसेवकांसह मी स्विकृत नगरसेवक बहिष्कारात सहभागी झालो.दिनेश निखाडे, स्विकृत नगरसेवक , समुद्रपूरनगराध्यक्षासहीत सत्ताधारी सदस्य विरोधी पक्षातील सदस्यांना विश्वासात घेत नाही. विषय समिती सभापती केवळ नावाचे फलक लावणे व शोभेचा दर्जा प्राप्त करून घेण्याचा प्रकार आहे. विषय निहाय जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी विषय समिती सभापतींची कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही तसेच निर्णय केल्याचे निदर्शनास येत नाही. जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ नावाचे फलक न.प.च्या इमारतीत दर्शनिय भागावर लावणे, एवढाच उद्देश अनुभवत असल्यामुळे आम्ही सदर निवडणुकीवर बहिष्कार टाकला.मधुकर कामडी, विरोधी पक्षनेता, नगर पंचायत समुद्रपूरसभागृहामध्ये केवळ दहा नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी दहा सदस्यांमधून निवड प्रक्रिया राबविली.गजानन राऊत, नगराध्यक्ष, न.प. समुद्रपूर

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका