शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा वास्तुविशारदांना टाकणार काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:07 IST

प्रत्येक मालमत्ता धारकांनी घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांचे बांधकाम करताना त्याबाबतचा नकाशा तयार करून बांधकामाची परवानगी न. प. प्रशासनाकडून मिळविणे क्रमप्राप्त आहे; पण अनेक ठिकाणी मंजूर नकाशालाच बगल दिली जात असल्याचे वर्धा न.प. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देन.प.चा निर्णय : फौजदारी कारवाईला द्यावे लागेल तोंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक मालमत्ता धारकांनी घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांचे बांधकाम करताना त्याबाबतचा नकाशा तयार करून बांधकामाची परवानगी न. प. प्रशासनाकडून मिळविणे क्रमप्राप्त आहे; पण अनेक ठिकाणी मंजूर नकाशालाच बगल दिली जात असल्याचे वर्धा न.प. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत निदर्शनास आले आहे. मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम होत आहे की नाही याची जबाबदारी वास्तूविशारदांचीही असते. मात्र, ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. नियमांना बगल देणाºया वास्तूविशारदांना आता वर्धा न.प. प्रशासन काळ्या यादीत टाकत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार आहे.नगर परिषदेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या विकास नियंत्रण नियमावली २०१३ नुसार बांधकाम परवानगी बाबत कार्यवाही केली जाते; पण अनेक मालमत्ताधारक व परवानाधारक बांधकाम परवानगीचे नकाशे सादर करताना विकास नियंत्रण नियमावलीचे पालन करीत नसल्याचे न.प. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. सदर नियमावलीनुसार व न्यायालयाच्या विविध निर्देशानुसार बाधकामाबाबत परवानाधारक तांत्रिक व्यक्ती तसेच संस्थेवर विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार बांधकाम नकाशे सादर करताना व प्रत्यक्ष बांधकाम करताना नियमावलीचे पालन करणे ही बांधकामधारकाच्या बरोबरच तांत्रिक व्यक्तींची सुद्धा कायदेशीर जबाबदारी आहे. असे असले तरी अनेक वास्तूविशारद जबाबदारीकडे दुर्लक्षच करीत असल्याने न.प. प्रशासनाने कठोर कारवाईचा हा निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले.नगर परिषदेच्या सदर निर्णयानूसार नियमांना फाटा देणाºया वास्तू विशारदाबाबत कॉन्सील आॅफ आर्किटेक्चरकडे नोंदणी रद्द करण्याची शिफारस करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार बांधकाम न करणाऱ्या शहरातील मालमत्ताधारकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय बांधकाम करणारे विकासक आणि बिल्डर यांच्यावरही काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.आवेदन करता येते आॅनलाईनज्या व्यक्तीला बांधकामाची परवानगी मिळवायची आहे त्यांच्यासाठी आॅनलाईन सूविधा न.प. प्रशासनाने केली आहे. न.प.कडे सादर केलेल्या बांधकाम परवाना प्रस्तावाबाबत आश्यक नियमांची तसेच त्रुटींची पूर्तता त्वरित करून घेणे आणि नवीन बांधकाम धारकांनी बांधकाम प्रस्ताव विहित वेळेत आॅनलाईन सादर करणे क्रमप्राप्त आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सन २००५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे प्रस्ताव देखील बांधकामधारक न.प.कडे सादर करू शकतात. ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव न.प.कडे सादर करणेही गरजेचे आहेशासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सन २००५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे प्रस्ताव देखील बांधकामधारक न.प.कडे सादर करू शकतात. ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव न.प.कडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. नियमांना फाटा देणाऱ्यांवर दंडात्मकसह फौजदारी कारवाई करण्यात येईल. शिवाय नियमांना बगल देणाऱ्या वास्तूविशारदांवरही कारवाई होईल.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी न. प. वर्धा.