शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्र ठरतेय शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:12 IST

जिल्ह्यात मोठे तथा २० गावांची बाजारपेठ म्हणून वायगावची ओळख आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्व राखणाºया या गावात २० हजारांवरील लोकसंख्येसाठी केवळ आरोग्य उपकेंद्र देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जिल्ह्यात मोठे तथा २० गावांची बाजारपेठ म्हणून वायगावची ओळख आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्व राखणाऱ्या या गावात २० हजारांवरील लोकसंख्येसाठी केवळ आरोग्य उपकेंद्र देण्यात आले आहे. ते देखील अनेकदा बंदच राहत असल्याने सदर उपकेंद्र शोभेची वास्तू ठरत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.गावातील आरोग्य प्रशासन सुस्त आहे. परिणामी, नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असल्याने मंडी बंद करण्यात आली. त्याऐवजी प्राथमिक उपकेंद्र आहे. येथे प्राथमिक उपचार, प्रसूति तथा नागरिकांवर औषधोपचार होणे अपेक्षित होते; पण ते बंदच राहत असल्याने शोभेची वास्तू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या आरोग्य उपकेंद्रात दोन आरोग्य सेविका व एक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याची नेमणूक आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गावातील सर्वेक्षणाचे काम करतात. आरोग्य सेविकांना वरिष्ठांच्या आदेशावरून तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी जावे लागत आहे. यामुळे येथील आरोग्य उपकेंद्र बहुतांश वेळा बंदच असते. पालकमंत्र्यांनी प्रत्येक सोमवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यरत ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले होते; पण ते देखील पाळले जात नाही. यामुळे आरोग्य सेवेचा खेळखंडोबा झाला असून वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.