शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नागपुरी संत्री बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर आता दुबईतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:52 IST

आकाराने जरी ओबड-धोबड असला तरी चवीने नागपुरी संत्र्याने बाजी मारली आहे. त्याच्या आंबट-गोड चवीने आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या संत्र्याला फळांची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईतून मागणी आली आहे.

ठळक मुद्देवर्ल्ड आॅरेंज फेस्टीवलचे फलितएका महिन्याला जाणार पाच कंटेनर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आकाराने जरी ओबड-धोबड असला तरी चवीने नागपुरी संत्र्याने बाजी मारली आहे. नागपुुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टीवलमध्ये आलेल्या बाहेर देशातील व्यापाऱ्यांना या संत्र्याने चांगलीच भुरळ घातली. त्याच्या आंबट-गोड चवीने आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या संत्र्याला फळांची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईतून मागणी आली आहे.मोर्शी येथे असलेल्या श्रीधर ठाकरे यांच्या संत्रा प्रक्रिया केंद्रातून दुबई येथे काही संत्रे चवीकरिता पाठविण्यात आली होती. या संत्र्याला त्यांच्याकडून पसंती आली असून संत्र्यांची मागणी करण्यात आली आहे. येथून आलेल्या मागणीपोटी आठवड्यात एक असे महिन्याकाठी पाच कंटेनर पाठविण्यात येणार आहे. हे कंटेनर समुद्रामार्गे जाणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी येथे पंजाबी संत्री जात होती. त्यावर असलेल्या कोटींगमुळे ते दिसायला आकर्षक आणि टिकावू राहत असल्याने त्याची मागणी वाढली होती. या तुलनेत नागपुरी संत्र्यावर ही प्रक्रिया करण्याकरिता शासनाच्यावतीने पाहिजे तसे पाठबळ मिळत नसल्याने अडचणी कायम आहेत.विदर्भातील संत्र्याला बाजारात तसा दर मिळत नव्हता. यामुळे या संत्र्याला विदेशी ग्राहक मिळणे अपेक्षित होते. याचा प्रवास २० वर्षांपूर्वीपासूनच सुरू झाला. मोर्शी येथील प्रक्रिया केंद्रातून प्रारंभी दिल्ली, केरळ, जम्मू आणि आता मुंबई येथे संत्री पाठविण्यात येत आहे. यातूनच श्रीलंका आणि बांगलादेशात संत्रा पाठविण्यात येत आहे. याकरिता दिल्ली येथील दोन कंपन्यांना गे्रड निहाय संत्र्याची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातून आतापर्यंत ५८६ टन संत्रा पाठविण्यात आला आहे.

नागपुरी संत्रा हे खरे ‘टेबल फूड’परदेशात जाणाऱ्या संत्र्यात पंजाबी संत्राची अधिक मागणी आहे. मात्र ते संत्रं सहज सोलून खाता येत नाही. ते ज्यूसकरिता फायद्याचे ठरतात. या तुलनेत नागपुरी संत्री सहज सोलता येत असल्याने खाता येते. म्हणूनच नागपुरी संत्र खरे ‘टेबल फूड’ असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले होते. विदर्भात प्रथमच संत्र्याबाबत मोठी प्रदर्शनी लागली होती. शिवाय या संत्र्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. येथे संत्र्याचे देशपातळीवर मोठ मोठे व्यापारी आले होते. ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकारात या फेस्टीवलची सर्वत्र चर्चा झाली. येथूनच नागपुरी संत्र्यांची एक देशपातळीवर एक ओळख निर्माण झाल्याने या संत्र्याला मोठी बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा आहे.- श्रीधर ठाकरे, संत्रा उत्पादक संघटनेचे नेते, मोर्शी.दिसण्यात आणि रंगात सारखेपणा नाहीनागपुरी संत्र चवीला एकदम ‘बेस्ट’ आहे. पण ते बघायला सारखे नाही. शिवाय ते एका रंगाचे नाही. या संत्र्याचा काही भाग हिरवा तर काही भाग नारंगी आणि पिवळा दिसतो. यामुळे काही व्यापारी या संत्र्याच्या दर्जावर आक्षेप घेत आहेत. दिसायला ओबड-धोबड असलेल्या या संत्र्याला एक सारखा आकार येण्याकरिता कृषी तज्ज्ञांनी काही शोध लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :agricultureशेती