शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वर्ध्यातील जनता कर्फ्यूबाबत व्यावसायिकांतच मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:00 AM

शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन समर्थकांनी केले.

ठळक मुद्देचार दिवसांचा बंद ठरतोय आभासी : बड्या व्यावसायिकांची साथ, तर छोट्या दुकानदारांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनता कर्फ्यूच्या मुद्यावरून सुरुवातीपासून विरोध आणि समर्थनाचा धुराळा उडाला. जनता कर्फ्यूचा शुक्रवार हा पहिला दिवस होता. विशेषत: शुक्रवार गुमास्ता दिन असल्याने मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. मात्र, लघु व्यावसायिकांसह शहरातील इतरांची दुकाने मात्र सुरूच होती. शनिवार आणि रविवारीही या जनता कर्फ्यूला शहरात फारसा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र नव्हते. मुख्य बाजारपेठ बंद असतानाही काहींच्या दुकानांचे शटर उघडेच होते. त्यामुळे जनता कर्फ्यूवरुन व्यापाऱ्यांमध्येच मतभिन्नता असल्यानेच इतरांनी आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवली की काय? अशी शंकाही वर्धेकरांनी व्यक्त केली.शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन समर्थकांनी केले. मात्र, शुक्रवारप्रमाणेच रविवारीही मुख्य बाजारपेठेतील कापड लाईन, सराफा लाईन, पत्रावळी चौक, धान्य मार्केट, किराणा लाईन या भागात बंद असतानाही काहिंनी दुकानांचे शटर उघडले होते. तसेच शहरातील इतर परिसरातील दुकाने सुरू होती. फेरीवाल्यांसह, लघु व्यावसायिकांनी रोजीरोटीला महत्त्व देत आपली दुकाने सुरूच ठेवली. शहरात एकंदरीत मोठ्या व्यावसायिकांचा बंद असल्याचेच चित्र दिसून आले.मात्र, समर्थन करणाºयांनी बंद दुकानांचे तर विरोधकांनी उघड्या दुकानांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. वर्धेकरांच्या दृष्टीने आभासी ठरलेल्या या जनता कफ्यूमध्ये समर्थक आणि विरोधक यांना फारसे यश आले नसले तरी कोरोनाच वरचढ ठरला, हे निश्चित.‘त्या’ व्यापाºयांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हशहरामध्ये कोरोनाचा शिरकाव होताच प्रशासनाकडून शहरामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. तेव्हा शहरातील काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या कडक लॉकडाऊनचा विरोध केला होता. इतकेच नव्हे, तर प्रशासनाविरुद्ध एकजूट करण्यासाठी काहींनी व्यापाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण, प्रशासनाने वेळीच संचारबंदीअंतर्गत कारवाई करून त्यांची ही बैठक उधळून लावली होती. सुरुवातीला विरोध करणारे काही व्यापारी आता जनता कर्फ्यूकरिता अट्टहास करीत असल्याने कोरोनाकाळातील त्यांच्या या भूमिकेबद्दल वर्धेकरांच्या मनात शंकेने घर केले आहे.व्यावसायिकांची उपाययोजनांकडे पाठजिल्हा प्रशासनाने अनलॉकनंतर सर्व व्यावसायिकांनीच कोरोना प्रतिबंधित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. दुकानामध्ये सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे तसेच सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. बाजारपेठेत दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने या सर्व उपाययोजनांकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनता कफ्यूऐवजी व्यावसायिकांनी यावर भर देण्याची गरज आहे. सोबतच प्रशासनानेही यावर लक्ष देण्याची मागणी होत आहे.अ‍ॅन्टिजेनला विरोध अन् जनता कर्फ्यूला समर्थनकाही दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठेतील काही दुकानदार आणि दुकानात काम करणारे कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार केला होता. तसेच प्रशासनाकडून तेथेच अ‍ॅन्टिजेन टेस्टचीही व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आलेले व्यावसायिक या परिसरात राहत नसल्याने या ठिकाणी कंटेन्मेेंट झोन तयार करणे योग्य नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडतो. प्रशासनाने अ‍ॅन्टिजेन टेस्टची सक्ती करू नये, अशी आगपाखड करीत काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात मोहीम उभारली होती. तसेच काहींनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काही अंशी व्यापाºयांची मोहीम ‘फत्ते’ ही झाली. पण, आता तेच व्यापारी जनता कर्फ्यूला समर्थन दर्शवित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नो मास्क, नो एन्ट्रीकोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता प्रशासनाकडूनही लॉकडाऊनचा अधिकार काढून घेण्यात आले आहे. लॉकडाऊन करून लहान व्यावसायिकांसह नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी स्वत: च काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशीच भूमिका घेण्याची गरज आहे. आपली जबाबदारी ओळखून नियमित मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे ही सवय आता नागरिकांना अंगवळणी पाडावी लागणार आहे. मात्र, यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या