लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव : तळेगावची मुख्य ओळख असलेली जुनी वस्ती सध्या समस्येने त्रस्त आहे. जुन्या वस्तीत जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा विविध कारणाने नागरिकांसाठी अपघाताचे कारण बनला आहे. सिमेंट रस्त्याच्या सळाखी उघड्या पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे रस्ता दुरस्तीची मागणी होत आहे.मुख्य वस्तीकडे जाणारा रस्ता हा सिमेंटचा असल्यामुळे आणि कित्येक वर्षांपासून त्याची डागडुजी केली नसल्याने या सिमेंट रस्त्यावर वापरण्यात आलेल्या सळाखी जागोजागी पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून अवागमन करणाऱ्या नागरिकांना दुखापत होण्याची शक्ययता आहे. कारण या रस्त्यावरून वृद्धांपासून तर लहान मुलांपर्यंत सर्व नागरिकांची वर्दळ असते. रात्रीचे वेळी एखादेवेळसे रस्त्यावर बाहेर आलेल्या सळाखी अंधारात दिसल्या नाहीत तर रस्त्याने जाणाºया-येणाºया नागारिकांच्या पायाला लागल्या तर गंभीर इजा होवू शकते. तसेच सदर सळाखी वाहनाच्या टायरमध्ये घुसल्या तर गाडीचे नुकसान सुद्धा होवू शकते.आता जेमतेम पावसाळ्याला सुरुवात झाली. या रस्त्याची अक्षरश: चाळणी झालेली आहे. थोड्या जरी प्रमाणात पाऊस आला तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचण्यास सुरू होते. अशावेळी रस्त्यावरून चालणाºया पादचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. तर पादचाºयांप्रमाणेच दुचाकी चालकांना रस्त्याच्या दुरावस्थमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
सिमेंट रस्त्याच्या सळाखी उघड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:42 IST
तळेगावची मुख्य ओळख असलेली जुनी वस्ती सध्या समस्येने त्रस्त आहे. जुन्या वस्तीत जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा विविध कारणाने नागरिकांसाठी अपघाताचे कारण बनला आहे. सिमेंट रस्त्याच्या सळाखी उघड्या पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
सिमेंट रस्त्याच्या सळाखी उघड्या
ठळक मुद्देजुन्या वस्तीतील प्रकार : एकाच पावसात रस्त्यावर साचले डबके