लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या कालावधीत मुख्य भाजीबाजारात होणारी गर्दी टाळण्याकरिता येथील भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केट यार्डमध्ये हलविण्यात आला. पण, या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने हा उघड्यावर भरणारा भाजीबाजार आता पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे. मंगळवारी सकाळी पावसान हजेरी लावल्याने भाजी उत्पादकांची ताराबळ उडाली होती.बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने उघड्यावर लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. मंगळवारी सकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेवून मार्केटमध्ये आले होते. अशातच पावसाने हजेरी लावल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.या भाजीपाला पावसात भिजल्याने त्याचे भावही पडले. ओला झालेला भाजीपाला घराकडे परत नेणे शेतकºयांना शक्य नव्हते. त्यामुळे मिळेल त्या भावात भाजीपाला विकावा लागला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजार उघड्यावरच राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना कराव्या किंवा बजाज चौकातील भाजीबाजारातच व्यवस्था करण्याची मागणी भाजीपाला उत्पादकांकडून केली जात आहे.
उघड्यावर भाजीबाजार; उत्पादकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST
बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने उघड्यावर लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. मंगळवारी सकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेवून मार्केटमध्ये आले होते.
उघड्यावर भाजीबाजार; उत्पादकांना फटका
ठळक मुद्देपावसामुळे तारांबळ : कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार