शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

18 पैकी तीनच घाटांचे झाले लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी, आर्वी, देवळी या पाच तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, वणा व यशोदा नदी पात्रावरील ३७ वाळूघाट लिलावास पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी २९ वाळू घाटांना पर्यावरण अनुमती दिल्याने या घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु यातील जवळपास दहा घाट शासकीय कामांकरिता राखीव ठेवण्यात आल्याने ९ फेब्रुवारीला १८ घाटांचा ई-लिलाव करण्यात आला.

ठळक मुद्दे४ कोटी ९१ लाखांचा मिळणार महसूल : उर्वरित १५ घाटांकरिता फेरप्रक्रिया राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील १८ वाळूघाटांच्या लिलावाकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये केवळ तीन घाटांकरिताच सहा जणांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यामुळे तिन्ही घाटांचा वर्षभराकरिता ४ कोटी ९१ लाख २ हजार ८२८ रुपयांमध्ये लिलाव झाला असून उर्वरित १५ घाटांकरिता फेरलिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी, आर्वी, देवळी या पाच तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, वणा व यशोदा नदी पात्रावरील ३७ वाळूघाट लिलावास पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी २९ वाळू घाटांना पर्यावरण अनुमती दिल्याने या घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु यातील जवळपास दहा घाट शासकीय कामांकरिता राखीव ठेवण्यात आल्याने ९ फेब्रुवारीला १८ घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. यामध्ये देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई), टाकळी (चना), हिंगणघाटमधील जुनोना, बोरगाव (दातार), चिकमोह, टेंभा-परसोडी, घाटसावली, चिंचोली, खारडी-भारडी, काजळसरा, गणेशपूर-बोरखेडी तर समुद्रपूर तालुक्यातील शेकापूर (बाई), खुनी-वदली-सेवा, मांडगाव-२, मनगाव, बरबडी, उमरा-औरंगपूर रिठ, औरंगपूर रिठ-उमरा, चाकूर आणि पारडी या घाटांचा समावेश होता. परंतू जिल्ह्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध वाळू उपस्यामुळे शेकापूर (बाई), मांडगाव-२ आणि मनगाव या तीनच घाटांचा लिलाव झाला. त्यामुळे शासनाच्या तिजोरीतही महसूलाचा ठणठणाट असल्याने दिसून येत आहे.        

या कारणांमुळे लिलावधारकांनी निविदा भरण्याकडे फिरविली पाठ जिल्ह्यात वणा आणि वर्धा नदीपात्रातून सर्वाधिक वाळू उपसा होतो. वर्धा नदीपात्रावर अमरावती व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा आहेत.लगतच्या जिल्ह्यात पूर्वीच घाटांचे लिलाव झाल्यामुळे त्यांनी वर्धा जिल्ह्यातील लिलावाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.यावर्षी उशिराने घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे घाटधारकांनाही कमी कालावधी मिळणार असल्याने घाटाकरिता निविदा प्राप्त झाल्या नाहीत. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याने सहजच वाळू उपलब्ध होत आहे. त्यामुळेही लिलावाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.जिल्ह्यातील पाच वाळूघाट शासकीय बांधकामाकरिता राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे घाटधारकांकडून शासकीय कामाकरिता वाळू घेतली जाणार नसल्याने घाटधारकांनी यावर्षी लिलाव घेण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

यांनी लावली सर्वाधिक बोली हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील घाटकरिता तिघांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यातील लक्ष्मी इन्फ्रा या निविदाधारकाने १ कोटी ५५ लाख २९ हजार ९४८ रुपयात हा घाट घेतला. समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव-२ आणि मनगांव या दोन घाटांचा लिलाव झाला. मांडगाव येथील घाटाकरिता एकच निविदा प्राप्त झाली होती. मॉ दुर्गा ट्रेडर्सने हा घाट २ कोटी ९ लाख ११ हजार ८०० रुपयांमध्ये घेतला आहे. तर मनगाव येथील घाटाकरिता दोन निविदा प्राप्त झाल्यात. त्यामध्ये सुहानी बिल्डींग मटेरियल सप्लायर्सने १ कोटी २६ लाख ६१ हजार ८० रुपयात वाळू घाट घेतला आहे.

 

टॅग्स :sandवाळू