शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 27.10 टक्के व्यक्तींकडे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य’ कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:15 IST

आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. इतकेच नव्हे तर त्याची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातही केली जात आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ व्यक्तींची नोंदणी करून कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.

केवळ १,२९,१६८ व्यक्तींनीच घेतले कार्ड- गरीब आणि गरजूंसाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना फायद्याची आहे; पण वास्तविक पाहता उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित झाले आहे.

नवीन नोंदणी बंदचप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड मिळविण्यासाठी नवीन नोंदणी बंद आहे; पण ज्यांची यापूर्वी नोंदणी झाली आहे, मात्र कार्ड मिळाले नाही अशांना नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ते सहज प्राप्त करता येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत मिळतेय सेवा- जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजू व गरिबांना दिला जात आहे. यात सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय, कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय, हिंगणघाट येथील लोढा हॉस्पिटल, आर्वी येथील राणे हॉस्पिटल तसेच हिंगणघाट येथील अरिहंत डायलेसीस सेंटरचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ठरतेय दिलासा देणारी- २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीचा विचार केल्यास महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा जिल्ह्यातील तब्बल २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. एकूणच ही योजना गरजू व गरिबांसाठी दिलासा देणारीच ठरत आहे.

लिंक फेल होत असल्याने उद्भवतेय वेळोवेळी अडचणसुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्याचा मानस अधिकाऱ्यांचा असला तरी वेळोवेळी लिंक फेल होत असल्याने याचा नाहक त्रास चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोसावा लागत आहे. 

एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ इतके उद्दिष्ट असून, आतापर्यंत १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना कार्ड वितरित करण्यात आले आहे.- डॉ. स्मिता हिवरे, जिल्हा समन्वयक, वर्धा

 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत