शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आॅनलाईन कर्जमाफीत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 15:55 IST

सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणींमुळे वेटींगच सुटीच्या कारणाने उडते तारांबळ संपूर्ण नोंदीबाबत संभ्रम

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या राज्यात लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असले तरी शेतकºयांच्यामागील विघ्न हरण्यात तोही कमी पडत असल्याचे दिसते. कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता शेतकºयांना वेटींगच करावे लागत आहे. त्यातच अंतिम तारीख जाहीर झाल्याने संपूर्ण नोंदीबाबत सध्या संभ्रमच निर्माण झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना लागू झाली त्या काळापासून अंमलबजावणीकरिता अडचणीच आल्या आहेत. दरम्यान १५ सप्टेंबरपर्यंत सर्वच शेतकºयांच्या नोंदी झाल्या पाहिजे असे फर्मान मुख्यमंत्र्यांनी सोडले. दिलेल्या तारखेच्या आत आपली नोंद झाली पाहिजे असे शेतकºयांना वाटते. परिणामी शेतकºयांकडून ग्रामदूत केंद्रांवर एकच गर्दी होत आहे. एकाच वेळी सर्वत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सॉफ्टवेअर साथ देत नाही. वारंवार लिंक फेल होत आहे. शिवाय याकाळात बºयाच शासकीय सुट्ट्या आल्याने केंद्र बंद असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले आहे.सरकसकट तर कधी नियमांच्या अधीन राहून कर्जमाफीची घोषणा झाली. यानंतर कर्जमाफीच्या लाभाकरिता आॅनलाईन नोंदी करण्याचा फतवा निघाला. आॅनलाईन नोंदीत प्रारंभीच्या दिवसांपासूनच लिंक फेलची तलवार शेतकºयांच्या मानगुटीवर पडली. यानंतर आधार लिंकच्या समस्याने डोके वर काढले. यावर मार्ग काढण्याकरिता मंत्रा नामक यंत्राची मागणी झाली. ते यंत्र आले असता काही दिवस सॉफ्टवेअरची समस्या आली. आता अंतिम तारीख आल्याने होणाºया गर्दीमुळे ही समस्या आणखीच जाणवत आहे.वर्धेत ३८,७६७ शेतकºयांचीच नोंदच्शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या आॅनलाईन नोंदीकरिता महिन्याचा कालावधी होत आहे. यात वर्धेत आॅनलाईन आणि मंत्रा या यंत्राचा खोडा पडल्याने आॅफलाईनचा मार्ग काढण्यात आला. या आॅफलाईनच्या प्रकारामुळे शेतकºयांना आॅनलाईन होण्याकरिता ग्रामदूत केंद्रांवर चकरा मारव्या लागल्या. असे अतानाही वर्धा जिल्ह्यात केवळ ३८ हजार ७६७ शेतकºयांची आॅनलाईन नोंद झाली आहे. तर ३२ हजार ९८० शेतकºयांनी अर्ज भरले असून त्यांची नोंद होणे बाकी आहे. वर्धेत एकूण ९८ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यामुळे दिलेल्या तारखेच्या आत सर्व शेतकºयांची नोंद होईल अथवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.