शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात येणारा कांदा, बटाटा, लसूण आणि आले उतरणार गावाबाहेर; होणार निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:44 IST

राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु, याच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमधून ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात आलू, कांदा, अद्रक आणि लसूण आणल्या जातो. सदर जीवनावश्यक वस्तूंसोबत वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर वर्धा जिल्ह्यातील तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहराबाहेर ठरवले तीन अनलोडिंग पॉईंटजिल्हा प्रशासनासह कृउबाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु, याच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमधून ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात आलू, कांदा, अद्रक आणि लसूण आणल्या जातो. सदर जीवनावश्यक वस्तूंसोबत वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर वर्धा जिल्ह्यातील तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेली वाहने सॅनिटाईज करून त्यातील माल पूर्वी सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या मालवाहूत लादून त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना पुरवठा केल्या जाणार आहे. दत्तपूर टी-पॉईंटवरील अनलोडिंग पॉईंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते करण्यात आला.वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नागपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तेथील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांला लागणारा आलू, कांदा, लसूण व अद्रक इतर जिल्ह्यातून येतो. या जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारे अनेकांच्या संपर्कात येताच त्यामुळे त्यांच्या माध्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून वर्धा शहराच्या दूर दत्तपूर शिवारात अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आला आहे. असेच अनलोडिंग पॉईंटट जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी तयार करण्यात आले असून दत्तपूर शिवारातील अनलोडिंग पॉईंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तहसीलदार प्रिती डुडुलकर, जिल्हा माकेर्टींग अधिकारी गौतम वालदे आदींची उपस्थिती होती. अनलोडिंग पॉईंटटवर पहिल्या दिवशी एकूण १३ मोठ्या मालवाहूतील आलू, कांदा, लसूण दक्षता घेत उतरविण्यात आला.अशी राहते मागणीजिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी २० टनाचे ७ ते १० ट्रक कांदा तसेच तितकाच आलू, तीन ट्रक लसून व दोन ट्रक अद्रकाची आवश्यकता असते. शिवाय तशी मागणी असते. ही जीवनावश्यक वस्तू इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येते. ती कोरोनामुक्त रहावी तसेच त्याची वाहतूक करणाऱ्यांच्या संपर्कात कमीत कमी व्यक्ती यावे या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन दत्तपूर टी-पॉईंट भागातील एका हॉटेलच्या आवारात अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आला आहे.चालक राहतो भ्रमणध्वनीवर संपर्कातआलू, कांदा, लसून व अद्रक घेऊन वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या मालवाहूचा चालक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात भ्रमणध्वनीवर राहतो. तो मालवाहू घेऊन वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करणार त्यावेळी त्याला अनलोडिंग पॉईंटचे स्थळ सांगण्यात येते. त्याठिकाणी तो पोहोचल्यावर त्याचे वाहन सॅनिटाईज केले जाते. शिवाय त्या मालवाहूत असलेल्या व्यक्तींना वेगळे ठेवले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या वाहनात हा माल लादून वर्ध्याच्या व्यापाऱ्यांना वितरीत केला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी सांगितले.कोरोना बाधित जिल्ह्यांमधून वर्धा जिल्ह्यात आलू, कांदे, लसूण आणि अद्रकाची आयात होत. परंतु, या जीवनावश्यक वस्तूंसोबत कोरोनाची एन्ट्री वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर जिल्ह्यात तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून सदर जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेले वाहन सॅनिटाईज केले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या वाहनात हा माल लादून तो व्यापाऱ्यांना दिला जातो. त्यांच्या माध्यमातून या मालाचा इतर व्यावसायिकांना पुरवठा होणार आहे. यामुळे जिल्हा कोरोनामुक्त रहाण्यासाठी फायदा होणार आहे. शिवाय आलू, कांदा, लसूण व अद्रकाची जिल्ह्यात टंचाई निर्माण होणार नाही.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस