शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वणा नदीत एकाचा मृतदेह सापडला; दोघे अद्याप बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठीसाठी गेलेल्या महिला पैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. यापैकी रिया रंजीत भगत हिला नदीत वाहत असताना पोलिसाने बाहेर काढले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देवणा नदीच्या पात्रात शोधमोहिम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील वणा नदीच्या पात्रात चार जण वाहून गेले होते. त्यापैकी रिया भगत हिला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात यश आले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज अभय भगत याचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला आहे. अद्यापही दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, अभय भगत याचा मृतदेह कोसारा सोईटच्या वर्धा नदी पुला पलीकडे २६ तासानंतर मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला. त्याच वेळी आपत्ती व्यवस्थापन पथक सुद्धा बोटीने पोहचले. त्यांचे सोबत आ. समीर कुणावार होते. येथील वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठीसाठी गेलेल्या महिला पैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. यापैकी रिया रंजीत भगत हिला नदीत वाहत असताना पोलिसाने बाहेर काढले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे असले तरी रियाची मुलगी अंजू भगत, मुलगा अभय भगत तसेच दीपाली मारोती भटे या तिघांचा शोध शर्तीचे प्रयत्न करूनही सोमवारी लागला नव्हता. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता पुन्हा नव्या जोमाने आपत्ती व्यवस्थापन पथकातील चमूने शोध मोहीम सुरू केली. सहा सदस्यांनी एका बोटीतून प्रवास करून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. या पथकाने पारडी नगाजीला दुपारी थोडा वेळ थांबा घेऊन वणा वर्धा नदीचा संगम जोड सावनगी जवळ असताना त्यांना थोड्या वेळापूर्वी एक मृतदेह वाहत गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तातडीने पुढे जात कोसारा नंतर सोईटच्या पुलाजवळ असताना त्यांचे पुढेच सदर मृतदेह आज दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास आढळून आला. तो नदीपात्राबाहेर काढण्यात आला. या शोध पथकाला किशोर दिघे, आशीष परबत, अनिल गहेरवार, बाळू वानखेडे, रुपेश लाजूरकर यांनी सहकार्य केले. सायंकाळी सहा वाजता शोध मोहीम थांबविण्यात आली. अद्यापही दोघांचे मृतदेह सापडले नसल्याने उद्या पुन्हा नव्या जोमाने शोध मोहीम राबविली जाणार आहे.

 

टॅग्स :riverनदी