वायगाव बेड्यावर धाड : चौघांविरूद्ध गुन्हे पुलगाव : दुर्गोत्सव, शारदा उत्सव दसरा, मोहरम आदी सण शांततेत व सुव्यस्थेत पार पडावे यासाठी गुरुवारी पुलगाव पोलिसांद्वारे वायफड पारधी बेडा येथे वॉश आऊट मोहीम घेण्यात आली. मोहिमेदरम्यान मोह सडवा, पाच लोखंडी ड्राम व दारू गाळ्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर कारवाईत २१ लोखंडी ड्राम, २१०० लिटर मोहा सडवा, ७० लिटर गावठी मोहा दारू, असा एकूण १ लाख ८ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला. सदर वॉश आऊट मोहिमेत सीता हीरालाल पवार रा. वायफड, बकुबाई जगलेवार पवार रा. वायफड, सरिता मुकेश भोसले रा. वायफड, संजय कवडूजी चरडे रा. रसूलाबाद यांच्यावर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, उप विभागीय अधिकारी पुलगाव डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे, पोलीस उपनिरीक्षक राजुरकर, प्रकाश लसुंते, विवेक धनुले, संजय रिठे, सुधाकर बावणे, नरेंद्र दिघडे, रवींद्र मुजबैले, भारत पिसुड्डे, किशोर लभाने, क्रिष्णा कास्टेकर, अमोल आत्राम, सागर गिरी, पवन निलेकर, अंकुश येडमे, सुशांत देशमुख, मुकेश राऊत, राकेश शिवनकर, निर्मला थुल, चव्हाण यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
वॉश आऊट मोहिमेत एक लाखांचा मोहा दारूसाठा नष्ट
By admin | Updated: October 7, 2016 02:25 IST