शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पदाधिकाऱ्यांंनी लसीकरणाची ओनरशिप घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

१ एप्रिलपासून ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी त्यापूर्वीच लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस घेतल्यानंतर काही दिवसांत  कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्याचे टोकाचे परिणाम होत नाही. लोकांना गंभीर होण्यापासून वाचविते. त्यामुळेच या लसीचे महत्त्व असून, या लसीबाबतचा गैरसमज टाळावा. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मोटारगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी देवळीकर यांनी दिली.

ठळक मुद्देसुरेश बगळे : ६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी अभियान यशस्वी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक पालिकेचे पदाधिकारी तसेच सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ६० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी या कामाची जबाबदारीतून ओनरशिप घ्यावी, जनजागृती करावी तसेच त्यांना लसीकरणाच्या केंद्रापर्यंत आणून मदत करावी, असे विचार उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी व्यक्त केले. तहसील कार्यालयात  कोरोना लसीकरणाची बाजू मांडत असताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी विजय देवळीकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर ताम्हणकर, पालिकेचे उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, पवन महाजन, मारोती मरघाडे उपस्थित होते. शासकीय आकडेवारीनुसार कोरोना संसर्गाने मृत्यू होणाऱ्यात ६० वर्षांवरील नागरिकांचा अधिक समावेश असल्याने या वयोगटातील लसीकरणावर भर देण्यात यावा,  ३१ मार्चपर्यंत या वयातील कोणतीही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी बगळे यांनी दिले. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी त्यापूर्वीच लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस घेतल्यानंतर काही दिवसांत  कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्याचे टोकाचे परिणाम होत नाही. लोकांना गंभीर होण्यापासून वाचविते. त्यामुळेच या लसीचे महत्त्व असून, या लसीबाबतचा गैरसमज टाळावा. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मोटारगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी देवळीकर यांनी दिली. बैठकीला प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, पंकज गावंडे, ज्ञानेश्वर जाधव, जनार्दन ढोक, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पवार, संघर्ष  मोर्चाचे प्रवीण कात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची गती वाढवासमुद्रपूर : जेष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वर्षाच्या विविध आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. ३१ मार्चपर्यंत लसीकरण करण्याच्या उद्देश्याने तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,नगरसेवक,स्वयंसेवक रासेयोचे स्वयंसेवक आदींनी समोर येऊन कोरोना लसीकरण बाबत जनजागृती करून जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करावे असे आवाहन तहसीलदार राजू रणवीर यांनी केले आहे लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व लसीकरणाचे प्रमाण वाढावे या दृष्टीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.यावेळी तहसीलदार राजू रणवीर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी मार्गदर्शन केले या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना  म्हैसकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष वर्षा बाभुळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. मेघश्याम ढाकरे, आरोग्य विस्तार अधिकारी वानखेडे, शिवसेनेचे रवींद्र लढी, पंचायत समिती सदस्य गजानन पारखी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप डगवार,कांग्रेसचे विनोद हिवंज ,माजी उपाध्यक्ष रवींद्र झाडे माजी नगरसेवक मधु कामडी, प्रवीण चौधरी,पंकज बेलेकर, तारा अडवे, इंदू झाडे, सुषमा चिताडे,वनिता कांबळे ,दिनेश निखाडे, आशा वासनिक, प्रफुल्ल महंतारे, नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी धुमाळे उपस्थित होते . 

सरपंचांचा लसीकरणासाठी पुढाकारआष्टी(शहीद) : कोरोनाने थैमान घातल्याने शासन निर्देशाप्रमाणे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता सुजातपूर येथील सरपंच प्रवीण ठाकरे यांनी स्वखर्चाने लसीकरणाचा कार्यक्रम पार पाडला. खासगी गाड्या करून गावातील ५५ नागरिकांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत लसीकरण केले. तर ग्रामपंचायतीमध्ये कोविड तपासणीकरिता शिबिराचे आयोजन केले. यामध्ये १७० नागरिकांनी चाचणी केली. या उपक्रमाचे तहसीलदारांनी कौतुक केले. सुजातपूर ग्रामपंचायतीअंतर्गत कोरोना लसीकरणासाठी गावातून आष्टीला जाण्यासाठी शेतकरी, शेतमजूर यांना दिवसभर वेळ काढून जावे लागत असल्यामुळे व मजुरी पडत असल्याने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सरपंच प्रवीण ठाकरे यांनी ग्रामस्थांना मोफत लस देण्यासाठी कार्यक्रम आखला.  त्यानुसार दोन्ही कार्यक्रम पार पाडले. ग्रामपंचायतीमध्ये कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार आशिष वानखडे, नायब तहसीलदार रणजित देशमुख यांनी केले. या वेळी मंडळ अधिकारी अनिल जगताप, सरपंच प्रवीण ठाकरे,  ग्रामसेवक राजू जवंजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता तुमडाम,  डॉ. पल्लवी बुटले, शिक्षक मंगेश अतकरणे, राजेराम दारोकर, अंगणवाडी सेविका पुष्पा गवळीकर, आशा वर्कर रेखा निकाळजे, प्रियंका भोस आदी उपस्थित होते. या वेळी सुजातपूर गावातील एकूण १७० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  ६० वर्षांवरील एकूण ५५ नागरिकांना लसीकरणासाठी नेण्यात आले. उपक्रम स्वखर्चाने राबविल्यामुळे सरपंच ठाकरे यांचे तहसीलदारांनी कौतुक केले. 

कोरोना लसीकरणासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

सेवाग्राम : कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे.यात मृत्यूचे प्रमाणही वाढतांना दिसून येत आहे. खबरदारी,नियमांचे पालन आणि सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन दवंडी आणि वाहनांची व्यवस्था केली आहे. हमदापूरच्या पुढे उमरा गाव असून या ग्रामपंचायत अंतर्गत वायगांव बैलमारे गाव आहे. हे गाव मांडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येते. लस घेण्यास अनेक कारणे व अडचणी वयोवृध्दांनी सांगितल्या. अनेकांनी भीती व्यक्त केली. सरपंच उमेश चौधरी, उपसरपंच प्रीती माटे, सचिव विनोद महाराष्ट्र, हंसा चौधरी, वर्षा जवादे यांनी बैठक घेऊन एक वाहन भाडे तत्त्वावर घेऊन जेष्ठांना लसीकरणाकरिता  मांडगांव येथे नेण्यात आले. या सुविधेमुळे ग्रामपंचायत अंतर्गत गावातील १०० टक्के लसीकरण होणार आहे. शुक्रवारला तेरा लाभार्थिंनी लस घेतली.सेवाग्राम ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत, सचिव वासुदेव रोहनकर, सदस्य सुशिल कोल्हे, मुन्ना शेख, दिनेश गणवीर, आशा सेविका नलिनी ओंकार, रंजना भोयर, डोंगरे, पूनम भोंगाडे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शंभर टक्के रहिवाशांचे लसीकरण झाले पाहिजे, यावर विचार विनिमय झाला. गावात साठच्यावरील नागरिकांनी कस्तुरबा रूग्नालयात जाऊन लस घ्यावी. नंतर शासन-जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे नागरिकांनी लस घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन दवंडीतून करण्यात आले.  

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस