शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या खर्चाची माहिती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:18 IST

वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने केलेल्या खर्चाची माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांच्या चमूने दररोजचा खर्चविषयक अहवाल खर्च चमूला सादर करावा, असे निर्देश वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक काशीनाथ झा यांनी दिलेत.

ठळक मुद्देकाशीनाथ झा : विविध नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने केलेल्या खर्चाची माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांच्या चमूने दररोजचा खर्चविषयक अहवाल खर्च चमूला सादर करावा, असे निर्देश वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक काशीनाथ झा यांनी दिलेत.निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या खर्चाची माहिती संकलित करणाऱ्या विविध नोडल अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, निवडणूक खर्च नोडल अधिकारी शेळके, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, माध्यम सनियंत्रण नोडल अधिकारी मनीषा सावळे, आयकर विभाग, पोलीस विभाग आणि सह्ययक खर्च निरीक्षक, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी विवेक इलमे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.बैठकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामाची माहिती समजून घेतली. यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी आतापर्यंत जिल्ह्यात रोख रक्कम, शस्त्र जप्ती, मद्य आणि गुन्ह्यासंदर्भात आणि निवडणुकीमध्ये आवश्यक कर्मचाºयांची माहिती दिली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रेत्यांवरील कारवाईची माहिती दिली.निवडणूक खर्च नोडल अधिकारी यांनी सर्व विभागांकडून खर्चविषयक माहिती रोज संकलित करीत असल्याचे सांगितले. यावेळी झा यांनी वर्धा हा दारूबंदी असलेला जिल्हा असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दारूवर नजर ठेवावी आणि कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. सर्वांनी स्वत:चे आयकार्ड सोबत ठेवावे अशा सूचनाही त्यांनी केल्यात. मनीषा सावळे यांनी प्रसारमाध्यम कक्ष तयार करण्यात आला असून रोज जिल्ह्यात येणारे आणि जिल्ह्यातून प्रकाशित होणारी वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सवर देखरेख करण्याचे काम सुरू असून खर्चविषयक अहवाल दररोज पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी लोकसभा निवडणुकीसंबंधी पॉवर पॉइंट सादरीकरण केले.

टॅग्स :Electionनिवडणूक