शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'दफ्तर दिरंगाई कायदा' कागदावरच

By admin | Updated: May 9, 2014 01:48 IST

राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराला आवर घालणे व कामात नियमितता, सुसूत्रता आणण्याकरिता 'दफ्तर दिरंगाई कायदा २00५' लागू केला; पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही.

वर्धा : राज्य शासनाने शासकीय कर्मचार्‍यांच्या गलथान कारभाराला आवर घालणे व कामात नियमितता, सुसूत्रता आणण्याकरिता 'दफ्तर दिरंगाई कायदा २00५' लागू केला; पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळे अद्यापही शासकीय कामकाजात सुसूत्रता आलेली नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कायद्यावर अंमल करणे गरजेचे आहे.दप्तर दिरंगाईकायद्यानुसार प्रशासकीय प्रकरणांचा निपटारा दिलेल्या मुदतीत करणे बंधनकारक आहे; पण पुलई येथील शेतकर्‍याने फेरफाराकरिता अर्ज करून १३५ दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्याप प्रकरणाचा निपटारा झाला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने तलाठी गोटे यांच्याविरूद्ध दफ्तर दिरंगाई कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदन शेतकरी गणेश गायकी यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे. गायकी यांचे मौजा पुलई शिवारात सर्व्हे क्रं. ५९ मध्ये शेत आहे. त्यांनी फेरफाराकरिता १९ ऑगस्ट २0१३ रोजी अर्ज केला होता. नियमानुसार या प्रक्रियेला १५ दिवसांचा कालावधी लागतो. गायकी हे निर्धारित कालावधीनंतर ग्रा.पं. कार्यालयात गेले; मात्र त्यांना तलाठय़ाने नंतर येण्यास सांगितले. वारंवार चकरा मारूनही काहीच उपयोग झाला नाही. अखेर त्रस्त शेतकर्‍याने तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले; पण तलाठय़ाने याकडे दुर्लक्षच केले. कागदपत्रांची पोचपावती मागितली असता तलाठय़ाने नकार दिला. यामुळे शेतकर्‍याने लोकशाही दिनात तक्रार करून न्यायाची मागणी केली; पण अद्याप कुठलीही कारवाईकरण्यात आली नसून शेतकर्‍याला कागदपत्रेही मिळालेली नाहीत. याकडे लक्षदेत दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाईची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)