शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांची वहिवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:49 IST

वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे.

ठळक मुद्देवर्धा-हिंगणघाट मार्ग : महामार्ग प्राधिकरण,कंत्राटदाराची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. समन्वय आणि नियोजनाच्या अभावामुळे ही विकासकामे शेतकरी आणि नागरिकांकरिता डोकेदुखी ठरू लागली आहेत. अनेकांची रस्ता कामामुळे वहिवाट धोक्याची झाली असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, नव्याने झालेल्या रस्ता बांधकामाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. रस्त्याचे बांधकाम करताना कुणाची वहिवाट ठप्प होऊ नये, याचे भान कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाने ठेवले नाही. यामुळे रस्ता अतिशय उंच तर शेतशिवार खाली गेले आहे. परिणामी शेतकऱ्यांना घसरगुंडीप्रमाणे तयार झालेल्या ढिगावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. जिवावर उदार होत बैलबंडीनेही शेतीसाहित्याची वाहतूक करावी लागत आहे. यापूर्वी अनेक शेतकºयांना बैलबंडी घसरून अपघात झाला. कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. मात्र, कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. शेतात जाण्यास रस्ता नसल्याने अनेकांवर कापणीला आलेली पिके शेतातच ठेवण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, शेतात जाण्याकरिता रस्त्याचे कंत्राटदाराने बांधकाम करून दिले नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांची महामार्ग प्राधिकरणाकडून थट्टा केली जात आहे. शेतात जाण्याकरिता रस्त्याचे बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी सुनील हिवंज, देवराव हिवंज, प्रवीण जाधव, भरणे, काशीकर, वाणी यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी शेतातच ठेवला शेतमालरस्त्याचे बांधकाम करताना शेतकऱ्यांचे मत ग्राह्य धरण्यात आले नाही. रस्ता बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, रस्ता उंच आणि शेती खाली अशी आज परिस्थिती आहे. यात वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि चण्याची पोती शेतातच ठेवली आहेत. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा स्थितीत शेतमाल शेतातच भिजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.सध्या पीक काढणीचा हंगाम आहे. रस्ता बांधकामात वहिवाट अडचणीत आली आहे. मजुरांचा आधीच तुटवडा आहे. मजूर मिळत असताना वहिवाटीयोग्य रस्ता नसल्याने मजूर शेतात येण्यास नकार देत असून पीक काढणीत खोडा निर्माण झाला आहे.सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे