जिल्हाधिकार्यांच्या सूचना : पिककर्ज मेळावे आयोजित
वर्धा : खरीप हंगामामध्ये शेतकर्यांना त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज पुरवठा करण्यासाठी ४८१ कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकर्यांनी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकेतून खाते उघडून आवश्यकतेनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एन.नवीन यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बºहाटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, शुभांगी साठे, कृषी समन्वय कार्यक्रम अधिकारी सुरेश नेमाडे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामातील कृषी उत्पादनासंदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक गावात गावबैठका घेण्यात येत असून, यामध्ये बियाणे, बियाण्यांची निवड त्यावर प्रक्रिया तसेच मशागती संदर्भात संपूर्ण माहिती कृषी विभागातर्फे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बºहाटे यांनी दिली. जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी खरीप हंगामाचा आढावा बैठकीत घेतला. यावेळी विविध विभागाच्या उपाययोजनांबाबतही आढावा घेण्यात आला.(प्रतिनिधी) बिज प्रक्रिया करून पेरणी करावी शेतकर्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध करून देतांना सोयाबीनसह इतर बियाणे पेरणीपूर्वी त्याची चाचणी घ्यावी तसेच शेतकर्यांनी बिज प्रक्रिया करूनच बियाणे पेरावे. सोयाबीन बियाण्यांच्या मागणीनुसार बियाण्यांचा पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी शेतकर्यांनी आपल्या जवळील सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले.