शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न.प. कडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:32 IST

नगर परिषदेने २००६--०७ ला केलेल्या कर आकारणी प्रमाणेच कर वसूली करावी व नवीन कर आकारणी म्हणजे २०१२--१३ प्रमाणे दिलेल्या कर वसूली नोटिस प्रमाणे कर वसुली करू नये असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०१५ ला दिलेला असतांनाही नप सरसकटपणे २०१२-१३ प्रमाणे कर वसूली करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत आहे. या बाबत जनतेने जुन्या पद्धतीने कर भरणी करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.

ठळक मुद्देमालमत्तेच्या कराची वसूली २००६-०७ प्रमाणे करा : सुधीर कोठारी यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर परिषदेने २००६--०७ ला केलेल्या कर आकारणी प्रमाणेच कर वसूली करावी व नवीन कर आकारणी म्हणजे २०१२--१३ प्रमाणे दिलेल्या कर वसूली नोटिस प्रमाणे कर वसुली करू नये असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०१५ ला दिलेला असतांनाही नप सरसकटपणे २०१२-१३ प्रमाणे कर वसूली करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत आहे. या बाबत जनतेने जुन्या पद्धतीने कर भरणी करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.या बाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड. कोठारी म्हणाले की, नगर परिषद शहरातील मालमत्तेवर दर चार वर्षांनी कर आकारणी करीत असते. सन २००६--०७ -२००९--१० या चार वर्षासाठी पालिकेने मालमत्ता कराची आकारणी केलेली होती. परंतु नंतर २०१०-१२ या वर्षांत नवीन कर आकारणी न झाल्यामुळे २०१२-१३ ची कर आकारणी २०१६ -१७ ते २०१८-१९ मध्ये कायम राहिली. व नगर पालिका त्या नुसारच कर आकारणी करीत आहे. सन २०१२-१३ मध्ये केलेल्या कर आकारणी विरोधात येथील संदीप इंदरचंद गांधी, व आरती प्रदीप हरणे नागपुर खंडपीठात सदर करआकारणी विरोधात दाद मागितली. व ही कर आकारणी रद्द करण्यात आली. नगर पालिका सदर आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाने २०जूलै २०१५ ला एक आदेश देऊन पालिकेने सन २००६-०७ या जुन्या दराप्रमानेच कर आकारणी करावी व वसूली करावी असे आदेश दिले. २०१२-१३ प्रमाणे कर वसुली करू शकणार नाही असा स्पष्ट आदेश दिला. मात्र पालिका सरसकट २०१२-१३ प्रमाणे कर वसूली करीत असल्याने या अन्यायकारी कर वसुलीचा फटका सर्वांनाच बसत असल्याचा आरोप अ‍ॅड. कोठारी यांनी केला.सर्व समविचारी लोकांना सोबत घेऊन या विरोधात आंदोलन करणार आहे. जनतेला याबाबत कोणती समस्या असेल तर त्यांना संपूर्ण कायदेशीर मदत पुरविणार असल्याचे अ‍ॅड. कोठारी यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक आफताब खान, अशोक रामटेके, माजी नप अध्यक्ष सुरेश मुंजेवार, हिंमत चतुर, धनंजय बकाणे, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते