शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

एसटीपेक्षाही कमी तिकिटात करा आता ट्रॅव्हल्सने वर्धा- नागपूर, पुणे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 17:20 IST

बुकिंगचे प्रमाण वाढले : दिवाळीत तिकीट दरवाढीबाबत अद्याप निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : एसटी महामंडळाने महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात दिलेल्या सवलती बघता बहुतेक प्रवासी शासकीय बसनेच प्रवासाला प्राधान्य देतात. याचा धसका घेत ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घेतला आहे. प्रवासी टिकवून ठेवण्यासाठी एसटीपेक्षा कमी दरात नागपूर, पुणे, औरंगाबाद प्रवास सुरू आहे. बुकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, दिवाळीत तिकीट दरवाढीचा अद्याप निर्णय न झाल्याने एसटीपेक्षा कमी दरात प्रवास सध्या सुरू आहे.

दिवाळी सण ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी पर्वणी मानली जाते. त्यामुळे दिवाळी व भाऊबीज सणादरम्यान प्रवाशांची गर्दी वाढते. याचा फायदा घेत ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटाच्या दरात वाढ करतात, असा प्रवाशांचा अनुभव आहे. मात्र, शासनाच्या वतीने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सलवत देण्यात आल्याने याचा परिणाम ट्रॅव्हल्स व्यवसायावर झाला आहे. प्रवाशी मिळविण्यासाठी महिलांसाठी ट्रव्हल्स संघटनेच्या वतीने विषेश सवलत सुरू केली होती. मात्र ही अल्प काळासाठीच वर्धा- नागपूर मार्गावरील ट्रव्हल्स मध्ये होती. 

भाडेवाढीसंदर्भात अद्याप निर्णय नाही 

  • दिवाळी सणादरम्यान प्रवाशांची संख्या बरीच वाढलेली असते. वाढलेल्या संख्येचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या घेतात. याच कालावधीत बऱ्याचदा महामंडळाचे कर्मचारी संप पुकारतात. त्यामुळे खासगी बसे- सशिवाय पर्याय राहात नाही. 
  • भाऊबिजेसाठी भाऊ व बहीण तसेच कुटुंबीय आपल्या नातेवा- इकांकडे ये-जा करतात.
  • दिवाळी सणात काळी-पिवळी ट्रॅक्स चालकही प्रवासीसंख्या वाढल्याचा फायदा घेतात. अचानक भाडेदरात वाढ करतात. त्यामुळे प्रवाशांच्या आर्थिक पिळवणुकीचे प्रकार होत असतात.

शहरातून रोज जातात ट्रॅव्हल्सच्या १०० फेऱ्या जिल्हा मुख्यालय असल्याने वर्धा येथून नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, औरंगाबाद, पुणेसह अन्य शहराला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स दिवसभर फेऱ्या मारतात. दिवसभरात १००पेक्षा जास्त फेऱ्या मारल्या जातात. यात वर्धा नागपूर, वर्धा- चंद्रपूर दर १५ मिनिटाला ट्रॅव्हल्स फेरी मारली जाते.

कोणत्या मार्गावर धावतात बसेस शहरातून जवळपास जिल्हा, तालुकासह राज्यातील प्रमुख शहरांत जाण्यासाठी एसटीसह खासगी बसेसची सुविधा आहे. यात वर्धा- नागपूर, वर्धा - हिंगणघाट, वर्धा - चंद्रपूर, वर्धा- औरंगाबाद, वर्धा - पुणे यांसह अन्य शहरांसाठी खासगी कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स रोज धावत आहे.

असे आहेत ट्रॅव्हल्सचे दर ट्रॅव्हल्समधून वर्धा ते नागपूर प्रवासासाठी वातानुकूलित ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला १५० रुपये, तर साध्या ट्रॅव्हल्स प्रवासासाठी १०० रुपये भाडे मोजावे लागत आहे. तर एसटीत शिवशाहीसाठी १७० रुपये, तर जलद बससाठी ११५ रुपये मोजावे लागत आहे. तेच वर्धा- पुणे प्रवासासाठी खासगी बसमध्ये ८०० ते ९००, वर्धा ते औरंगाबाद प्रवासासाठी ७०० ते ७५०, तर वर्धा- ते लातूरसाठी ६०० ते ६५० रुपये भाडे आकारले जाते. शासकीय बसच्या तुलनेत हे भाडे कमी असल्याचे सांगण्यात आले.  

टॅग्स :wardha-acवर्धा