शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना दंडासह वेळप्रसंगी मिळेल काठीचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करताच महसूल, पोलीस तसेच राजस्व विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मागील रविवारी संचारबंदीच्या काळात काही बेशिस्त विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. काही बेशिस्तांमुळेच वर्धा तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने संचारबंदीच्या काळात बेशिस्तांवर धडक कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देसक्तीच्या संचारबंदीत वर्धा तालुक्यावर केले जाणार लक्ष केंद्रित : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी उतरणार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे. याच संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, वेळप्रसंगी बेशिस्तांना काठीचा प्रसादही मिळणार आहे. ३६ तासांच्या संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासन कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करताच महसूल, पोलीस तसेच राजस्व विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मागील रविवारी संचारबंदीच्या काळात काही बेशिस्त विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. काही बेशिस्तांमुळेच वर्धा तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने संचारबंदीच्या काळात बेशिस्तांवर धडक कारवाई केली जाणार आहे. वर्धा शहर व शहराशेजारील १३ गावांमध्ये संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल, नगरपालिका तसेच राजस्व विभागाची एकूण १२ पथके सज्ज करण्यात आली आहेत. याच पथकांतील अधिकारी व कर्मचारी बेशिस्तांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणार आहेत. विशेष म्हणजे रविवारी वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एसडीएम सुरेश बगळे व एसडीपीओ पीयूष जगताप रस्त्यावर उतरणार आहेत.

शहरातील प्रमुख चौकांत केली जाणार नाकेबंदीसंचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाने केले आहे. पण, मागील रविवारी अनेक व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रविवार, २८ फेब्रुवारी रोजी कुणी व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी वर्धा शहरातील प्रमुख चौकांत पोलिसांकडून नाकेबंदी केली जाणार आहे.

२० व्यक्तींच्या उपस्थितीतच करता येणार लग्नसोहळारविवार, २८ फेब्रुवारी रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने काहींनी मंगल कार्यालये आरक्षित केली आहेत. असे असले तरी रविवारी जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू राहणार असल्याने या काळात केवळ २० व्यक्तींच्या उपस्थितीतच नागरिकांना लग्नसोहळे आटोपते घ्यावे लागणार आहेत.

विशेष पथकाचा राहणार वॉचसंचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे प्रत्येक मंगल कार्यालयात पालन केले जात आहे ना? याची शहानिशा करण्यासाठी मंडळ अधिकारी झामरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचारी रविवारी वर्धा शहर आणि शहराशेजारील ग्रा.पं.च्या हद्दीत असलेल्या प्रत्येक मंगल कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शिवाय बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

परीक्षार्थ्यांनी ओळखपत्र ठेवावे सोबतरविवार, २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाची परीक्षा आहे. या परीक्षार्थ्यांना संचारबंदीच्या काळात परीक्षा देण्यासाठी जाता येणार असले तरी प्रत्येक परीक्षार्थ्याने आपले ओखळपत्र सोबत ठेवणे क्रमप्राप्त आहे.

सक्तीच्या संचारबंदीच्या काळात वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करावे.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या