शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आता ‘क्रॉसचेक-डबलचेक’ मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 9:56 PM

निवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे.

ठळक मुद्देइव्हीएमला व्हीव्हीपॅटची साथ : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रात्यक्षिकांतून माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे. त्यामुळे आता मतदाराला आपले मत कुणाला गेले याबाबत ‘क्रॉसचेक व डबलचेक’ करता येणार आहे. यासाठी जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण, प्रसार व जनजागृतीबद्दल माहिती देऊन मशीनचे प्रात्यक्षिक ही यावेळी अधिकाºयांनी करुन दाखविले. आगामी निवडणुकींमध्ये प्रथमच इव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने जनतेमध्ये विश्वासर्हता निर्माण व्हावी म्हणून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. प्रशासनाच्यावतीने मागील तीन महिन्यांपासून मतदार यादीचे सुसुत्रीकरण करण्यात आले. यामध्ये नवीन मतदारांच्या नावाचा समावेश करण्यासोबतच मृतकांचे नाव वगळणे तसेच गाव सोडून गेलेल्यांची नावे गाळणे हे सर्व कामे करण्यात आली आहे. आता प्रत्येक गावांमध्ये अंतीम मतदार यांदी पाठविली जाणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधींनी आपले बुथ लेवलवर प्रतिनिधी नियुक्त करुन मतदार यादींची तपासणी करावी, तसेच नागरिकांनीही याची तपासणी करुन काही आक्षेप असल्यास तात्काळ कळवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.यावेळी सामान्य व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा साळवे यांच्यासह विभागीतील कर्मचारी उपस्थित होते.१६ पथक राबविणार जनजागृती मोहीमजिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील महत्वांच्या गावामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता १६ पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये एकूण ८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार ठिकाणी या मतदान पद्धतीचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे स्थानक , बस स्थानक, सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र, शाळा-महाविद्याल यांचा समावेश असणार आहे. प्रात्यक्षिक करतांना मतदारांना काही शंका असल्यास त्याचे निकाकरण करण्यात येईल. त्यांनी जितके प्रश्न उपस्थित केले तितक्याच सुधारणा करण्यासही सोयीस्कर होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.३५ हजार नवीन मतदार नोंदणीजिल्ह्यात मतदान नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. यामध्ये जवळपास ३५ हजार नव मतदारांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली. तसेच आतापर्यंत १० लाख मतदारांची यादी तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यावर्षी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्दारे होणारे हे मतदान अनेकांसाठी नवीनच राहणार असल्याने अनेकांना उत्सुकताही वाढणार आहे.काय आहेत व्हीव्हीपॅटआतापर्यंत इव्हीएम मशीनव्दारे मतदार केले जायचे. त्यामध्ये कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट असायचे. बॅलेटपेपरवर असलेल्या चिन्हापुढील बटन दाबली की बीप आवाज करुन मतदान झाल्याची नोंद व्हायची.परंतु आपण कुणाला मतदान केले याची श्वास्वती होत नसल्याने अनेकांनी या इव्हीएमवर आक्षेप नोंदविले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने इव्हीएम मशीनसोबतच व्हीव्हीपॅड जोडले आहे. त्यामुळे मतदाराने कुणाला मतदान केले हे त्याला सात सेकंदापर्यंत बघता येणार आहे. त्यानंतर तो बॅलेटपेपर त्या पेटीत पडणार आहे. आक्षेप आल्यास परवानगी घेऊन शहानिशाही करता येणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक