शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘बाला’ संकल्पना देणार विद्यार्थ्यांना शैक्षणिक ‘प्रेरणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ३ जून रोजी आढावा बैठक घेतली. मागील वर्षामध्ये शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन तंत्राचा अवलंब केला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २८ जूनपासून होत आहे. विद्यार्थी हा शाळेतच जास्त वेळ राहत असल्याने शाळेत आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. याच संकल्पनेतून अत्यंत कमी खर्चामध्ये ‘बाला’ ही संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : समृद्ध शाळेकरिता साहित्य निर्मितीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विद्यार्थी चार भिंतींबाहेर जास्त वेळ फक्त शाळेतच राहत असतो. त्यामुळे केवळ शालेय परिसरच हा स्वच्छ असून चालत नाही, तर शाळेचे बाह्यांग-अंतरंगही सुंदर आणि शैक्षणिक प्रेरणा देणारे असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांमध्ये सुंदर, स्वच्छ आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आनंददायी शिक्षणांतर्गत ‘बाला’ संकल्पना (बिल्डिंग अ‍ॅज लर्निंग एड) राबविली जाणार आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ३ जून रोजी आढावा बैठक घेतली. मागील वर्षामध्ये शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन तंत्राचा अवलंब केला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २८ जूनपासून होत आहे. विद्यार्थी हा शाळेतच जास्त वेळ राहत असल्याने शाळेत आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. याच संकल्पनेतून अत्यंत कमी खर्चामध्ये ‘बाला’ ही संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे. या संकल्पनेतून शाळेमधील उपलब्ध जागा आणि इमारतीचा विचार करून विशिष्ट जागांमध्ये अभिनव बदल करणे, कल्पकतेने दारे, खिडक्या, फरशी, छत, भिंती, व्हरांडा, स्वच्छतागृह, हॅन्डवॉश स्टेशन व मैदाने यांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करण्यावर भर दिला जाणार असल्याने शाळा परिसर बोलका होणार आहे.

असे करावे लागणार बदल

इमारत 

- शालेय गेट ते वर्गखोली पर्यंतचे अंतर मोजणे- खिडकीची प्रत्यक्ष लांबी, रुंदी, उंची मोजणे- घड्याळासह वर्गातील दिनदर्शिका तयार करणे- पाण्याच्या टाकीचे वास्तव आकारमान वजन काढणे

वर्गखाेली

- दरवाजाच्या खालील फरशीवर कोन आख- अक्षर लिपीच्या आकाराचे तक्ते तयार करणे- वर्गातील पंखे रंगचक्राने (ता.ना.हि.पा.नि.पि.जा) रंगविणे- अपूर्णांकासाठी विविध साधने तयार करणे.- चौकडीचे फळे, ठिपक्याचे फळे तयार करणे- छतावर अवकाशीय ग्रहमाला सूर्यग्रहण चंद्रगहण तयार करणे

मैदान

- आवारातील पडीक जागेचा वापर ओटे बांधून करणे.- दोन इमारती मधील जागेचा वापर कल्पकतेने करणे,- जुन्या टायरचा वापर करुन मुलांच्या अतिरिक्त उर्जेचे समायोजन करणे- देशाचा नकाशा विटांनी बांधून त्यात माती वाळू टाकून त्याचा भौगोलिक अभ्यासासाठी वापर करणे,- ध्वजस्तंभाच्या सरकणाºया सावलीचा सौरघडयाळ ग्रहांच्या भ्रमणकक्षा म्हणून वापर करणे.- नैसर्गिक वातावरणासाठी वनस्पती उद्यान करून त्यातील झाडांना नावाच्या पाट्या लावणे.- छतावर पांढरा रंग देऊन सूर्याची उष्णता परावर्तीत करणे- डेरेदार वृक्षांची आग्नेय, दक्षिण, पश्चिम दिशेस लागवड करुन संगोपन करणे.- डेरेदार 

 

टॅग्स :Educationशिक्षणcollectorजिल्हाधिकारी