शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुपीकता वाढीसाठी आता तंत्रज्ञानाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:36 IST

रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे.

ठळक मुद्देश्रेडर यंत्र ठरणार उपयोगी : बोंडअळीचे कोष नष्ट करण्याचा मार्ग

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे. या सर्वांवर सेंद्रिय शेती, हाच एक पर्याय असल्याचे सर्वमान्य असले तरी प्रत्यक्ष कुणी धाडस करताना दिसत नाही; पण आता बोंडअळीच्या निमित्ताने का होईना शेतकरी ‘श्रेडर’ या यंत्राच्या साह्याने शेतातील कपाशी काढत आहे. जमिनीचाब कस वाढविण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.कपाशीवर गुलाबी व बोंडअळीने हल्ला केला. परिणामी, एक-दोन वेच्यातच शेतातील कापूस संपला. काहींनी धाडस तथा खर्च करून उर्वरित कापूस वेचला; पण तो विविध आजारांना जन्म देणारा ठरत आहे. शिवाय व्यापारी तो खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. बोंडअळीने हल्ला केलेली कपाशीची शेती सध्या शेतकºयांना डोकेदुखीच ठरत आहे. कपाशी उपटण्याकरिता मजूर सापडत नाही. शिवाय ती मुळासकट शेतातून बाहेर करायची असल्याने अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कपाशीची शेती जैसे थे ठेवल्याचे दिसते. असे असले तरी पूढील खरीप हंगामासाठी जमीन मोकळी करावी लागणार आहे. यामुळे शेतकरी मिळेल त्या मार्गाने कपाशीची शेती रिकामी करीत आहे.कपाशीची शेतजमीन रिकामी करण्यासाठी शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांत नवीन पर्याय उपलब्ध आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने चालविता येणाऱ्या ‘श्रेडर’ यंत्राद्वारे शेतातील कपाशीची झाडे उपटून टाकता येतात. हे यंत्र केवळ पऱ्हाटी उपटतच नाही तर त्याचे बारिक कुटारामध्ये रूपांतर करते. यामुळे शेतकरी, शेतमजुरांचे श्रम वाचतात. शिवाय कपाशीच्या झाडांची बारिक भुकटी शेतातच पडून राहिल्याने बायोमास जमिनीत जाऊन सुपिकता वाढते. यामुळे श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे नेणारा दुवा ठरणार असल्याचेच दिसते.१२०० ते १५०० रुपये एकरप्रमाणे खर्चसध्या काहीच गावांमध्ये श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. या यंत्राद्वारे शेतकरी शेतातील कपाशी काढून घेत आहेत. हे यंत्र कमी असल्याने कपाशी काढण्याकरिता अधिक आकारणी केली जात असल्याचे दिसत आहे. सध्या १२०० ते १५०० रुपये प्रती एकरप्रमाणे कपाशीची काढणी केली जात आहे. ही रक्कम अधिक वाटत असली तरी शेतकऱ्यांना मजुरांकडून कपाशी काढण्याकरिताही सुमारे ८०० ते १००० रुपये प्रती एकर खर्च लागत आहे. या यंत्राचा फायदा अधिक असल्याने शेतकऱ्यांनी त्याद्वारे कपाशीची उलंगवाढी करणे उपयुक्त ठरणार आहे.शासनाकडून सबसिडीशेतकºयांना श्रेडर खरेदी करण्यासाठी यांत्रिकीकरण योजनेतून शासनाकडून ६३ हजार रुपयांची सबसिडी दिली जाते. सदर यंत्राची बाजारात किंमत १ लाख ७५ हजार रुपये असून शेतकºयांना केवळ १ लाख १२ हजार रुपये खर्च करायचे आहे. यातून ट्रॅक्टरधारक शेतकºयांना व्यवसायही उपलब्ध होऊ शकतो. या यंत्राद्वारे कपाशीची काढणी करण्यासाठी यंत्रधारकास डिझेल, चालक असा ६०० रुपये प्रतीएकर खर्च येतो. यामुळे यातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.प्रत्येक गावातील किमान एका ट्रॅक्टरधारक शेतकऱ्याने श्रेडर मशीन खरेदी करावी. या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय गावातच यंत्र राहिल्यास शेतकऱ्यांनाही कमी खर्चामध्ये शेतजमिनी रिकाम्या करता येतील.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.