लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : बोंडअळीच्या संकटात सापडलेला परिसरातील कपाशी उत्पादक शेतकरी सावरण्यापूर्वीच आता त्याच्यासमोर लाल ढेकुणाचे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना तालुक्यातील कृषी विभागाने मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर झाला. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच सध्या कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गुलाबी बोंडअळीनंतर आता लाल ढेकुणचाही प्रादुर्भाव परिसरातील काही शेतात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे लाल ढेकुण सध्या बोंडअळीपासून वाचलेल्या कापशीचेही नुकसान करीत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. कपाशीच्या एका बोंडात दहा पेक्षा जास्त संख्येने शिवाय कपाशीच्या झाडावरही हे लाल ढेकुण दिसून येत आहे.नाचणगाव, पुलगाव आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या हे लाल ढेकुण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पूर्वीच गुलाबी बोंडअळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून लाल ढेकुण या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेकांसाठी अन्न उगविणाऱ्या अन्नदात्याची आर्थिक परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे फार नाजूक अवस्थेत सध्या आली आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तात्काळ परिसरातील कपाशी उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी परिसरातील कपाशी उत्पादकांची आहे.
आता कपाशीवर लाल ढेकुणाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:28 IST
बोंडअळीच्या संकटात सापडलेला परिसरातील कपाशी उत्पादक शेतकरी सावरण्यापूर्वीच आता त्याच्यासमोर लाल ढेकुणाचे संकट उभे राहिले आहे.
आता कपाशीवर लाल ढेकुणाचे आक्रमण
ठळक मुद्देकपाशी उत्पादकावरील संकटाची मालिका कायम : कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव