शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आता रेशनऐवजी रक्कम; साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 16:38 IST

शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी योजना : एपीएल शेतकरी कार्डधारकांना मिळतोय लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना आता रेशनऐवजी दरमहा १७० रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत २ हजार ४६६ कार्डधारक असून, ८ हजार ७४६ शेतकरी लाभार्थीच्या खात्यात जुलैपर्यंतची रक्कम टाकण्यात आली आहे.

अन्य रेशनकार्डधारक शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांनाही यापूर्वी दोन रुपये किलो तांदूळ व तीन रुपये किलो गव्हाचा लाभ देण्यात येत होता. मात्र, या योजनेत यानंतर धान्य पुरविता येणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे व १ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाला कळविले आहे. त्यामुळे या रेशन कार्डधारकांना आता रेशनधान्याऐवजी दरमहा १५० रुपये देण्याचे पुरवठा विभागाने सुरू केलेले आहे. त्यानंतर या रकमेमध्ये २० रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता प्रतिलाभार्थी १७० रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थीना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो व अर्जाचा नमुनादेखील तेथेच मिळतो. अर्जासोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागत असल्याची माहिती आहे. 

तालुकानिहाय लाभार्थी शिधापत्रिकाधारकआर्ची - १,१८६देवळी - ४,१९१हिंगणघाट - १,९६६वर्धा - १,४०३

लाभार्थी संख्या - ८,७४६शेतकरी रेशनकार्डधारक - २,४६६

"एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी पैसे देण्यात येत आहेत. जिल्ह्यात एपीएल डीबीटीद्वारे ८,७४६ लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे." - शालिकराम भराडी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-pcवर्धा