शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:46 IST

शालेय शिक्षण विभागाने ८ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील मसुद्यामुळे ज्यांना बाधा पोहोचण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींकडून २३ जूनपर्यंत हरकती किंवा सूचना मागितल्या आहेत.

ठळक मुद्देहरकती नोंदविण्याची तयारी शिक्षक संघटनांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत मखाशा कर्मचारी नियमावली १९८१ च्या अनुसूची ‘फ’मधील प्रवर्ग ‘क’मध्ये असलेल्या नियमात सुधारणा करण्यासाठी शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्या अधिसूचनेवर हरकती नोंदविण्याची शिक्षक संघटनांनी तयारी चालविली असली तरी त्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.शालेय शिक्षण विभागाने ८ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील मसुद्यामुळे ज्यांना बाधा पोहोचण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींकडून २३ जूनपर्यंत हरकती किंवा सूचना मागितल्या आहेत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमाच्या मसुद्यात शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत अनुसूची ‘फ’मध्ये जी तरतूद आहे, त्या तरतुदीच्या प्रवर्ग ‘क’ मध्ये बदल करण्याचे ठरविले असून, या प्रवर्गात आता बी.ए./बी.एस.सी./बी.कॉम. डी. एड./डी. टी. एड./डी. एल. एड. अर्हतेच्या शिक्षकांचाही समावेश होईल, असे नमूद आहे. आतापर्यंत पदवीप्राप्त डी.एड. शिक्षकांचा समावेश प्रवर्ग ‘क’ मध्ये न होता प्रवर्ग ‘ड’ मध्ये होत होता. परंतु, या अधिसूचनेनुसार या शिक्षकांचा समावेश आता प्रवर्ग ‘क’ मध्ये होणार आहे. आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीनंतर अशा शिक्षकांची ज्येष्ठता यादी ही प्रवर्गानुसार ठेवण्यात येईल. आतापर्यंत एखाद्या शिक्षकाने सेवेत राहून आपली अर्हता वाढविल्यास त्याचा समावेश प्रवर्गात होताना त्याने जेव्हा अर्हता वाढविली, तेव्हापासून होत असे. या अधिसूचनेतील मसुद्यात प्रवर्ग क, ड अथवा ई मध्ये समावेश होण्यासाठी त्या प्रशिक्षित शिक्षकास आवश्यक अर्हता धारण करणे आवश्यक असेल. त्या प्रवर्गात त्याची ज्येष्ठता संबंधित प्रवर्गाच्या सेवेत रुजू झाल्याच्या दिनांकापासून किंवा नियुक्ती दिनांकापासून विचारात घेण्यात येईल, असे नमूद केले आहे. या वाक्यातील संभ्रमामुळे पदवीधर डी. एड. व पदवीधर बी.एड.शिक्षकांमध्ये गेल्या ३ ते ४ वर्षांपासूनचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या शिक्षकांवर होणार अन्यायअधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित शिक्षक माध्यमिकच्या सेवाज्येष्ठतेच्या सूचीमध्ये दावा करू शकणार नाही. त्याने वाढविलेल्या उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानल्या जाणार असल्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचे बोलले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची किनार?सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये आवळे प्रकरणात दिलेला निर्णय अद्याप कायम असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे शासनाला आवश्यक आहे. या नियमात दुरुस्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाची किनार असल्याने हरकती आल्यानंतरही ही अधिसूचना कायम राहिली तर शिक्षकांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक लक्षात घेऊन सेवाज्येष्ठता निश्चित केली जाईल. ज्येष्ठता मिळाल्यास अनेक शाळांमध्ये ज्येष्ठता सूचीतील क्रम बदलून पूर्व माध्यमिकमधून माध्यमिक विभागात काम करणाºया शिक्षकांना पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र