शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

प्लास्टिक उत्पादकांना नोटीस बजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:27 IST

निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी प्लास्टिकचे संकलन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : पर्यावरण समितीची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी प्लास्टिकचे संकलन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अशा कंपन्याना संकलन आणि पुन:निर्मिती करण्याबाबत, नोटीस देऊन जाब विचारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्यात.जिल्हा पर्यावरण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी पर्यावरणा संबंधी विविध प्रश्नाचा आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, उपवनसरंक्षक सुनील शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे, पर्यावरण तज्ज्ञ चोपडा, अशासकिय सदस्य मुरलीधर बेलखोडे, डॉ. सागर हेमके आदींची उपस्थिती होती.नगर परिषद क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया सयंत्र बसविणे याबाबत बैठकीत चर्चा झाली. नगर परिषद तसेच नगरपंचायत यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारी जागा निश्चित करुन त्यावर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियमांतर्गत कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, पुलगाव नगर परिषद क्षेत्रातील घनकचरा संकलन, व्यवस्थापन व हाताळणी व्यवस्थित होत नसल्याबाबत चोपडा यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत नगर परिषद, हिंगणघाट व वर्धा येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणेचे काम सुरू झाले असून ते लवकरात लवकर पुर्ण होण्याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रात घरगुती सांडपाणी विना प्रक्रिया वणा नदी मध्ये मिसळत असल्यामुळे वणा नदी तिरावरील कवडघाट ते हिंगणघाट हा परिसर प्रदुषित झाला आहे. त्यामुळे प्रदुषित पट्टयाच्या कृती आराखडयामध्ये हा परिसर मोडत असून हिंगणघाट नगर परिषदे तर्फे डिसेंबर २०२० पर्यंत सांडपाणी सयंत्राची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी सांगितले.याबाबत जिल्हाधिकारी यांनी हिंगणघाट आणि वर्धा शहराकरिता घरगुती सांडपाणी प्रक्रिया संयत्रण प्रकल्पाचे काम मंजूर झाले असून डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुरलीधर बेलखोडे आणि डॉ. सागर हेमके यांनी रस्ता बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याबाबत समितीला अवगत केले. याबाबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टाके यांच्याची तात्काळ दुरध्वनीवरून संपर्क साधून त्याना कडक शब्दात सुचना दिल्या.उद्योगांना सहा महिन्यांची मुदतदेवळी एमआयडीसीमधील महालक्ष्मी टीएमटी या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याची तक्रार राहुल चोपडा यांनी मांडली. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर उद्योगाची तपासणी केली असून त्यांना पुरेशी वायु प्रदुषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याबाबत. कळविण्यात आले आहे. सहा महिन्यात उद्योगाने वायु प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसविल्यास सदर उद्योगावर कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.