शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी इंचभरही जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा निर्धार : विरूळ येथील शेतकरी सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय करीत आहे, अशा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची विशेष सभा रविवारी घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करताना कायदा आपल्या बाजुने आहे. कुणाच्याही दबावाला किंवा फसव्या आमिषाला शेतकºयांनी बळी पडण्याची गरज नाही. आपला निर्धार आणि एकजुट असली तरच शासनाकडून आपण कायदेशीर संघर्ष करून आपल्या मागण्या मान्य करू घेऊ शकतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.अनेक शेतकऱ्यांवर जमिनींची किंमत ठरवताना अन्याय झाला आहे. त्यांनी आपली निवेदने देवून आपल्या जमिनीचे मोल पुर्णपणे घ्यावे. त्यासाठी आपण पुन्हा संघर्ष करण्यासाठी तयार आहो असेही यावेळी प्रा. गमे यांनी सांगितले. या सभेत शेतकऱ्यांसह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सभेत ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी जाणार आहे त्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचे एकमताने निश्चित करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली. तसेच प्रा. सय्यद, विनय डहाके, जीतेंद्र गोरडे, निळकंठ राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला राजेंद्र झिले, विनोद पारिसे, लुकेश सावरकर, संतोष डोळे, प्रवीण झाडे, अनिल गळहाट, मनोहर गोंडाने, गोविंद मेहरे, सुभाष भोयर, गुणवंत धामले, रमेश उरकुडे, देवानंद कनेरी, वंजारी यांच्यासह विरूळ, रसुलाबाद भागातील शेतकरी हजर होते.योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलनविरुळ येथे पार पडलेल्या विशेष सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कायदे तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी कुठल्याही आमिषांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. इतकेच नव्हे तर सभेदरम्यान ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी संपादीत होणार आहे त्यांना योग्य मोबदला न दिल्यास रस्त्यावर येत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.