शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य!

By admin | Updated: December 16, 2015 02:13 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे शब्द शाळांच्या मुलांकडून प्रभातफेरीच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळते.

सामाजिक संघटना व प्रशासनाच्या पुढाकाराची गरज : केवळ तीन किमी प्रवासासाठी वाहनाचा वापरराजेश भोजेकर  वर्धापर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे शब्द शाळांच्या मुलांकडून प्रभातफेरीच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळते. या अनुषंगाने निसर्ग सेवा समिती आणि नंतर अनेकांनी हे घोषवाक्य कृतीतून उतरविताना वर्धेकरांनी बघितले. शेजारच्या चंद्रपूरकरांनी वातावरणातील वायू प्रदूषणावर काही प्रमाणात का होईना मात करता यावी म्हणून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळायला सुरुवात केली. वर्धेतून नेहमीच क्रांतिकारी गोष्टींचा प्रारंभ झाला आहे. सारासार विचार केल्यास ‘नो व्हेईकल डे’ पाळणे वर्धेकरांसाठी सहज शक्य आहे.वर्धा शहराचा व्यास सुमारे सहा किमीचा आहे. एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायचे असल्यास तीन किमीचा प्रवास करावा लागतो. वास्तविक, एक ते दीड किमी अंतरात सर्वकाही आहे. असे असताना दुचाकी व चारचाकींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे अंतर सायकलद्वारे पार करणे शक्य आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुराड्यांमुळे शहराच्या वायू प्रदूषणात भरच घालण्याचे काम होत आहे. वर्धेकरांनी ‘नो व्हेईकल डे’ पाळायला सुरुवात केल्यास शहरात होणारे वायू प्रदूषण टाळता येणे सहज शक्य आहे. शहरात अनेक सामाजिक संघटना, पुढाकार कोण घेणार?शहरात अनेक स्वयंसेवी व सामाजिक संस्था आहेत. युवक संघटनाही आहे. इतकेच नव्हे, तर शिक्षण, मुख्याध्यापकांसह कामगार व कर्मचारी वर्गांच्याही संघटना सक्रिय आहेत. शहरातील कोणतेही स्थळ तीन. किं.मी.पेक्षा लांब नाही. अधिकारी वर्गांनाही त्यांची कार्यालये हाकेच्या अंतरावर आहे. ते आपल्या सदनिकेपासून कार्यालयात पायीही जावू शकतात वा सायकलचाही वापर करू शकतात, अशी परिस्थिती आहे. ‘नो व्हेईकल डे’च्या दिवशी आपले काम करण्याचे ठिकाण लांब असेल, तर पेट्रोलचा खर्च आॅटोरिक्षावर केला तर त्यांनाही सहज रोजगार प्राप्त होऊ शकतो. यामध्यमातून शहरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील. मनुष्यालाही मोकळा श्वास घेता येईल. वायू प्रदूषणामुळे होणारे आजार टाळता येईल. अनेकांना धुळीची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. दमाचा त्रास आहे. श्वसनाचे आजार आहे. त्यांना यातून एका दिवसासाठी का होईना, हायसे वाटेल. इंधनाची बचत व शहर निरोगी होईल महत्त्वाचे म्हणजे, इंधनाची बचत होईल. सायकल वा पायी प्रवास केल्यास शरीराचा व्यायाम होईल आणि आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल. वर्धेकरांनी नेहमीच चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला आहे. सर्वांगाने विचार केल्यास ‘नो व्हेईकल डे’ केवळ वायू प्रदूषणच टाळण्यासाठी नसेल, तर आपले आणि समाजाचे सोबतच शहराचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होईल. संघटना, संस्था तसेच प्रशासनाच्या माध्यमातून चार भिंतीच्या खोलीत विविध विषयावर समाज प्रबोधन करण्यात येते. या प्रबोधनाची गरज असली तरी ते कृतीतून केल्यास त्याचा प्रचार आणि प्रसारही झपाट्याने होतो. भविष्यातील धोका टाळण्यासाठी आताच पुढाकार हवा चंद्रपूरकरांनी वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. वर्धेकरांसाठी भविष्यातील वायू प्रदूषण टाळण्यासाठी हा निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे. सामाजिक, संघटना व प्रशासनाने पुढाकार घेतल्यास आठवड्यातील एक दिवस वा महिन्यातील दोन दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळणे अवघड नाही. चंद्रपूर पाठोपाठ वर्धेतही ‘नो व्हेईकल’ हा ‘पर्यावरण बचाव’चा पवित्र संदेश इतर जिल्ह्यात पोहचेल आणि त्याचे अनुकरण बघता बघता सर्वत्र बघायला मिळेल, अशी वर्धेकरांचीही मनोमन इच्छा आहे. फक्त गरज आहे पहिले ओ देणाऱ्याची. प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस जरी वाहन न चालविण्याचे ठरविल्यास केवळ प्रदूषण नियंत्रण होणार नाही तर इंधनावर होणारा खर्चही वाचेल. त्यामुळे नो व्हेईकल डे ला परिवहन विभाग पूर्ण समर्थन करीत आहे. - विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.‘नो व्हेईकल डे’ ही अतिशय स्तुत्य संकल्पना आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे जी मदत लागेल ती करण्यास आम्ही तत्पर आहोत.- चंद्रकांत बहादुरे, वाहतूक निरीक्षक, वर्धा‘नो व्हेईकल डे’ ही कल्पना केवळ मौज म्हणून न राहता नागरिकांनी याला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम हे शहर माझे आहे, ही भावना निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे असून बहार नेचर आणि आम्ही वर्धेकरचा याला पूर्ण पाठिंबा असणार. - संजय इंगळे तिगावकर, आम्ही वर्धेकर या उपक्रमापुरतीच नव्हे तर एरव्ही ही सायकल जास्तीत जास्त चालविण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने नो व्हेईकल डे एक चांगले पाऊल आहे. यासाठी सर्वप्रथम लोकांनी लाज विसरणे आवश्यक झाले आहे. - मुरलीधर बेलखोडे, निसर्ग सेवा समिती.प्रदूषण नियंत्रणासाठी नो व्हेईकल डे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याची गरज आहे. विशेष करुन शिकवणी वर्गाला जात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक व शिक्षकांनी सायकल अनिवार्य करावी.-आशिष गोस्वामी, प्राणीमित्र