शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता ना आम्हा भीती, लसीकरणाची मंद गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 22:28 IST

कोरोनाची पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्याकरिता फारच भयावह राहिली. त्यानंतर लसीकरणाला गती देण्यात आल्याने अनेकांचा कोरोनापासून बचाव झाला. या कोरोनाला रोखण्याकरिता दिवसरात्र काम करणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविड लसीकरणात प्राधान्य देण्यात आले. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी वर्ध्यात उपलब्ध झाल्या असून क्रमा-क्रमाने लसीकरणाला गती मिळाली. 

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  दोन वर्षे कोरोनाने चांगलाच हाहाकार माजविला होता. या आजारातून नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून लसीकरणाला गती देण्यात आली. लसीकरण हे एक सुरक्षा कवच ठरल्याने अनेकांचा कोरोनापासून बचावही झाला. त्यामुळे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोसही घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाची लाट ओसरताच नागरिकांच्या मनातीलही भीती नाहीशी झाल्याने कोविड लसीकरण करण्याचीही गती मंदावली. आता पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या फारच अल्प आहे. कोरोनाची पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्याकरिता फारच भयावह राहिली. त्यानंतर लसीकरणाला गती देण्यात आल्याने अनेकांचा कोरोनापासून बचाव झाला. या कोरोनाला रोखण्याकरिता दिवसरात्र काम करणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविड लसीकरणात प्राधान्य देण्यात आले. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी वर्ध्यात उपलब्ध झाल्या असून क्रमा-क्रमाने लसीकरणाला गती मिळाली. जिल्ह्यात एकूण १० लाख ७० हजार ३५२ व्यक्ती लसीकरणास पात्र असून त्यापैकी १० लाख ३२ हजार ६७३ व्यक्तींनी पहिला डोस घेतला. यापैकी केवळ ८ लाख १५ हजार ६७३ व्यक्तींनीच दुसरा डोस घेतला असून बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६३ हजार २३ इतकीच आहे. यावरून जसजशी कोरोनाची लाट ओसरत गेली, तसतशी नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाल्याने लसीकरणाकडेही पाठ फिरविल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

शासनाने दिलेली ‘डेडलाईन’ संपली- शासनाकडून पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांकरिता बूस्टर डोसही सुरू केला आहे. प्रारंभी ६० वर्षापेक्षा अधिक वयांच्या व्यक्तीकरिता बूस्टर डोस सुरू करण्यात आला. त्यामध्ये केवळ १६ टक्के व्यक्तींनीच हा डोस घेतला. यानंतर ४५ ते ५९ आणि १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींकरिता बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. - पण, यामध्ये डोस घेणाऱ्यांची संख्या नगण्यच राहिली. या वयोगटातील व्यक्तींकरिता शासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. आता तारीख संपूनही शासनाकडून कोणतेही पत्र आरोग्य विभागाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता लसीकरण होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फ्रंटलाइन वर्करही बुस्टरमध्ये मागेच- कोरोनाकाळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना आरोग्यासह इतर सुविधा पुरविण्याकरिता कंटेनमेंट झोन, कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष आदी ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना प्रथमत: लसीकरण करण्यात आले. त्यांचा पहिला व दुसरा डोस सर्वात झाला. पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोस आणि दोन्ही डोस घेणाऱ्यांनी बुस्टर डोस घेणे क्रमप्राप्त होते. परंतु पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या त्याहीपेक्षा कमी आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या