शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पांदण खुली करण्यासाठी नऊ महिने

By admin | Updated: August 26, 2014 23:39 IST

तालुक्यातील मौजा साखरा येथील साखरा ते सावली पांदण रस्ता क्ऱ ३२ वर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण हटवून पांदण मोकळी करावी, अशी मागणी शेतकऱ्याने तहसील कार्यालयात केली होती़

वर्धा : तालुक्यातील मौजा साखरा येथील साखरा ते सावली पांदण रस्ता क्ऱ ३२ वर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण हटवून पांदण मोकळी करावी, अशी मागणी शेतकऱ्याने तहसील कार्यालयात केली होती़ याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना अधिकाऱ्यांनी पंचनामा न करता काढता पाय घेतला़ यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़ याबाबत जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदनही देण्यात आले़वर्धा तालुक्यातील साखरा येथील शेतकरी बबन हागोडे यांचे साखरा येथे वडिलोपार्जीत शेतजमीन आहे़ शेत सर्व्हे क्ऱ १३३/१ आराजी ३़७२ हेक्टर आर शेती आहे़ या शेतावर साखरा ते सावली या पांदण रस्ता क्ऱ ३२ ने ये-जा करता येत होती; पण १ नोव्हेंबर २०१३ रोजी सुनीता जोगळेकर, हेमलता चांभारे व कुसुम चांभारे यांनी अतिक्रमण केले़ यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे़ या प्रकारामुळे त्रस्त शेतकऱ्याने तहसीलदार राहुल सारंग यांना निवेदन सादर केले़ यात सदर पांदण रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली़ शिवाय शेतकरी हागोडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांनाही निवेदन सादर केले़ यावरून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार राहूल सारंग यांना आदेश देण्यात आले़ यावरून त्यासंनी नायब तहसीलदार प्रीती डुडुलकर, सेवाग्रामचे मंडळ अधिकारी मंथनवार व तरोडा येथील तलाठी मिलिंद कुलकर्णी यांना कारवाईसाठी पाठविले़यावरून नायब तहसीलदार डुडुलकर, मंडळ अधिकारी मंथनवार, तलाठी कुलकर्णी हे साखरा येथे दाखल झाले; पण कारवाई न करताच पंचनामा करून परत गेले़ १० ते १५ दिवसांनी पुन्हा येऊन पांदण रस्ता खुला करून देऊ, असेही सांगण्यात आले़ सदर अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार असताना ते परत गेले़ यामुळे शेतकऱ्यावर नागपूरहून भाडेतत्वावर आणलेल्या जेसीबी मशीनचा भुर्दंड बसला़ शिवाय अन्य शेतकरी व हिंगणघाट पोलीस कर्मचाऱ्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला़ अतिक्रमण हटविण्यासाठी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित केली होती़ अर्जदार व पोलीस बंदोबस्त तयार होता; पण अधिकारी दुपारी ३ वाजता मोक्यावर हजर झाले़ शिवाय पंचनामा करूनच परत गेल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले़या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह पोलिसांना त्रास सहन करावा लागला़ नऊ महिन्यांचा कालावधी लोटला असताना पांदण रस्ता मोकळा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे़ हा रस्ता केवळ एकाच शेतकऱ्याला नव्हे तर साखरा येथील अन्य शेतकऱ्यांनाही वहिवाटीसाठी खुला करून देणे गरजेचे आहे़ असे असताना दिरंगाई केली जात असल्याने शेतकऱ्यांना अडथळा होत आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी हागोडे व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)