शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानाला ग्रामपंचायतीची बगल

By admin | Updated: May 8, 2014 02:11 IST

संपूर्ण राज्यातील ग्रा.पं. मध्ये शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव हा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे.

विरूळ (आ.) : संपूर्ण राज्यातील ग्रा.पं. मध्ये शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव हा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे. शासनाच्या या चांगल्या कार्यक्रमाने राज्यातील अनेक गावे स्वच्छ झालीत; पण आर्वीतालुक्यात महत्त्वाचे असलेल्या विरूळ येथील ग्रा.पं. तीन वर्षांपासून स्वच्छता अभियानच राबविले नाही. यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामस्वच्छता अभियानामुळे अनेक गावे आरशासारखी चकचकीत झाली असून ती आदर्शवत ठरलीत; पण आर्वी तालुक्यात सर्वात मोठे सामाजिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या विरूळ गावाने दोन ते तीन वर्षांत कधीही ग्रामस्वच्छता अभियान राबविले नाही. यामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील नाल्या तुंबल्या असून भवानी वॉर्डातील नाल्या पूर्णपणे बुजल्या आहेत. यामुळे गावातील सांडपाणी रस्त्यांवरून वाहताना दिसते. गावात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सांडपाणी तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू, मलेरीया आदी आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गाव अस्वच्छ व दुर्गंधीमध्ये हरविले असताना ग्रामपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसते. रसुलाबाद, सोरटा, हुसेनपूर या गावांजही हीच परिस्थिती पाहायला मिळते. केवळपिंपळगाव, वडाळा येथील सरपंच व नागरिकांनी गाव आरशासारख चकचकीत केले आहे. या गावाची प्रेरणा इतर गावातील नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनाने घेणे गरजेचे झाले आहे. शासनाचे आदेश असताना येथील ग्रामसेवकाने स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विरूळ, रसुलाबाद, सोरटा या गावांतील ग्रामसेवकांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ शासकीय आदेश आहे म्हणून अनेक गावांत हे अभियान कागदोपत्रीच राबविले गेल्याचे पाहायला मिळते.गावात रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढिगारे साचलेले असून रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्रासदायक ठरत आहे. ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याची मागणी ग्रामस्थांद्वारे होत असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने असंतोष पसरला आहे. गावातून वर्धेकडे जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचर्‍याचे ढिगारे असून गावातील मुख्य चौकातही नाल्या तुंबल्याचे दिसून येते. गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत साथीच्या आजारांचा उद्रेक होण्यापूर्वी ग्रामस्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनीही स्वच्छता राखणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)