शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

योजनांच्या माध्यमातून विकासाला नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 01:52 IST

विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. प्रत्येक योजना आपल्या गावात यावी यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक ..

वर्धा : विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. प्रत्येक योजना आपल्या गावात यावी यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक सतर्क असल्यास गावाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड यांनी केले.हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांसाठी माहिती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजय तपासे, पंचायत समितीचे उपसभापती मिलिंद कोपुलवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र भुयार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. राजू, भूजल सर्वेक्षणाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे भालेराव, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक एस.एस. करे, पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना तिमांडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमिला करपाते, पंचायत समिती सदस्य रमा कांबळे, समुद्रपूरचे गटविकास अधिकारी ए. एस. वायाळ, हिंगणघाटचे गटविकास अधिकारी विजय धापके यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यशाळेला उपस्थित लोकप्रतिनिधींना योजनांची माहिती देताना राठोड यांनी मानसाच्या जन्मापूर्वी ते निराधारापर्यंत विविध शासकीय योजना आहेत. विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवून ग्रामीण भागाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर बोलताना राजेंद्र भूयार यांनी ग्रामपंचायत, ग्रामविकासाची कामे, करवसूली, गोठे बांधकाम, वर्गीय कंपोस्ट, सिंचन विहिर, शौचालय बांधकामांची कामे आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच माहिती अभियान कार्यशाळेवर प्रकाश टाकला. तर सभापती संजय तपासे यांनीही कार्यशाळेतून देण्यात येणारी माहिती उपयुक्त असल्याचे सांगितले. वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी वर्धा पॅटर्न, पाण्याचे महत्व, पाण्याची बचत या विषयांवर मार्गदर्शन केले. ग्रामीण विकास यंत्रणेचे भालेराव यांनी कामधेनू दत्तक ग्राम योजना, पशुसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच करे यांनी वनजमीन, वनामध्ये प्राणी हल्ल्यातील नुकसान भरपाई, शेतजमिनीची भरपाई, अपंगत्व आदी विषयांवर सविस्तर योजनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. संचालन विनेश काकडे यांनी केले तर आभार विजय धापके यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)