शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:32 IST

देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी आज विठ्ठल चरणी घातले.

ठळक मुद्देभाविकांचे विठ्ठलाला साकडे : अनेक भाविक झाले नतमस्तक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी आज विठ्ठल चरणी घातले.मागील काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने अंकुरलेले पीकही माना टाकत आहेत. शिवाय दमदार पावसाअभावी जलाशयातही ठणठणाट आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण जलसंकटालाच सामोरे जावे लागले आहे. अशातच जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनीही तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची लागवड केली. जमिनीत ओलावा कायम राहिल्याने बियाणेही अंकुरले. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊसच बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.अशीच परिस्थिती पुढेही राहिल्यास पाणीबाणीच उद््भवेल. पाणीबाणीसह कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी वरुणराजाला वर्धा जिल्ह्यात बरसण्याची आज्ञा दे असे साकडेच शुक्रवारी भाविकांनी विठ्ठलाला घातले. वर्धा शहरातील मालगुजारीपूरा भागातील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिरात शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.५१ फूट उंच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळीहिंगणघाट : आभाळागत माया, तुझी आम्हावर राहू दे... सुख, समृद्धीचा पाट, साºया विश्वामध्ये वाहू दे... अशी मनोमन प्रार्थना विठ्ठला चरणी करीत येथील वणेच्या तिरावर ५१ फुट उंच विठ्ठल मूर्तीचे दर्शन करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आषाढी एकादशीचे औचित्य साधून वणा नदीच्या पैलतिरावर असंख्य भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. जवळपास ५ फूट वणेच्या पात्रातून चालत जात महिला, पुरुष भाविकांनी पैलतिर गाठला. माऊलीच्या दर्शनाने अवघे दु:ख दूर झाल्याची भावनाच यावेळी भक्त व्यक्त करीत होते. टाळ, मृदंगाच्या निनादात भक्तीरंगात रंगलेल्या भाविकांनी जय जय रामकृष्ण हरी आणि ज्ञानबा तुकाराम नामाचा जयघोष केला. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर विठ्ठलाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी रामाजी फाले, नगरसेवक धनंजय बकाने, प्रमोद गोहणे, राजू सेनाड, प्रवीण बोकडे, सुरेश वाटकर, भेंडे, आशीष इरखेडे आदींची उपस्थिती होती.प्रतिपंढरीत फुलला भाविकांचा मेळाघोराड : आषाढी एकादर्शीच्या निमित्ताने प्रतिपंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथे भाविकांचा मेळाच फुलला होता. येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच एकच गर्दी केली होती. एकादर्शीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले.भक्तिसागरात विद्यार्थीही तल्लीनवर्धा शहरातील केळकरवाडी भागातील सरस्वती विद्या मंदिरम् येथील विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. विठ्ठल नामाचा जयघोष करीत अनवाणी पायानेच विद्यार्र्थी या दिंडीत सहभागी झाले होते. पालखी पुजन परसोडकर यांनी केले. यावेळी देशपांडे, पांडे, जलताडे, वाघ, शेंडे, ढुमणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या दिंडीत विद्यार्थी कुर्ता-पायजामा तर विद्यार्थिनी नववारी परिधानकरून सहभागी झाले होते, हे विशेष.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी