देवळी : स्थानिक बसस्थानक चौकात होत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत राहिले़ यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे़ रस्त्यावरील रेतीमुळे नागरिकांची वाहने घसरून अपघात होत आहेत़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़कित्येक दिवसांपासून अर्धवट असलेल्या पुलामुळे वाहतूक त्रासदायक झाली आहे़ समोरच शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागतो़ ठाकरे चौक स्थित स्व़ महादेवराव ठाकरे थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या पुतळ्याची दुर्दशा झालेली आहे़ पुतळ्याभोवती गवत वाढले आहे; पण पालिकेचे सफाई कर्मचारी डोळेझाक करीत आहे़ गावातील अन्य पुतळ्यांचेही हाल झाले आहेत़ केवळ १५ आॅगस्ट, २६ जानेवारी वा जयंती, स्मृतिदिनीच हे पुतळे स्वच्छ होतात़ गावात प्रवेश करता क्षणी दिसणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचीही दुरवस्था आहे़ त्याची नियमित निगा न राखल्याने पुतळ्याभोवती असलेली रोषणाई व परिसर भकास झाला आहे़ डॉ़ आंबेडकरांच्या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ गावात येणाऱ्यांना गावाचे आकर्षण वाटणे गरजेचे आहे; पण त्याकडेच पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे़ सर्व सुविधा असताना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे़ सफाई कामगारांनी पुतळ्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे; पण तसे होत नाही़ पालिकेने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़(प्रतिनिधी)
पुलाचे अर्धवट बांधकाम व पुतळ्यांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त
By admin | Updated: April 29, 2015 01:53 IST